Mumbai Kandivali Accident CCTV Video Esakal
मुंबई

Mumbai Accident : ब्रेकऐवजी दाबला एक्सलेटर अन्..., कारनं तिघांना चिरडलं; मुंबईतील भीषण अपघाताचा CCTV व्हिडिओ व्हायरल

Mumbai Kandivali Accident CCTV Video: शिकाऊ कार चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबल्यामुळे हा अपघात झाला. २१ जूनला कांदिवलीमध्ये ही घटना घडली. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये भीषण अपघाताच्या मोठ्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईमध्ये भीषण कार अपघाताची घटना समोर आली आहे. शिकाऊ कार चालकाने ३ जणांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण जखमी झाले आहेत. कांदिवलीमध्ये ही घटना घडली आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिकाऊ कार चालकाने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबल्यामुळे हा अपघात झाला आहे. कारचालकाने तिघांना चिरडलं. कांदिवलीच्या पोयसर परिसरातच हा अपघात झाला. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. २१ जूनला अपघाताची ही घटना घडली होती.

कांदिवली परिसरात राहणारे टॅक्सी चालक राजेंद्र गुप्ता हे मित्र सुरेंद्र गुप्ताला शुक्रवारी कार चालवण्यास शिकवत होते. सुरेंद्रकडे कार चालवण्यासाठीचा परवाना नव्हता. तरी देखील तो विनापरवाना कार शिकत होता. यावेळी सुरेंद्रने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सलेटर दाबले. त्यामुळे कारने तिघांना चिरडले. जोरात धडक बसल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणे कार चालवल्याप्रकरणी कारमालक सुरेंद्र गुप्ता आणि चालक राजेंद्र गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT