कांदा पुन्हा रडवतोय! झाली 'इतकी' दरवाढ... 
मुंबई

कांदा पुन्हा रडवतोय! झाली 'इतकी' दरवाढ...

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कांद्याची आवक कमी झाल्यामुळे सोमवारी (ता.20) कांद्याच्या दराने उसळी घेतली. अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले, तर कांदा रोपांना पावसाचा फटका बसल्याने लागवड उशिरा झाली. त्यातच मध्यंतरी परदेशातून सुरू करण्यात आलेली कांद्याची आयात बंद करण्यात आली. त्यामुळे बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असून, परिणामी दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, मार्च अखेरपर्यंत कांद्याचे दर हे असेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

अवकाळी पावसामुळे शेतात कांद्याची लागवड उशिरा झाली. त्यामुळे सद्यस्थितीत माल उपलब्ध नाही. त्यातच देशी कांद्याच्या तुलनेत परदेशी कांद्याला उठाव नसल्याने आयात बंद करण्यात आली होती. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत असल्याने कांद्याच्या दरात वाढ झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. इजिप्तवरून येणाऱ्या कांद्याचे घाऊक दर शनिवारी (ता.18) 28 रुपये किलो होते. ते सोमवारी 38 रुपयांवर येऊन पोहचले आहेत. मध्यंतरी घाऊक बाजारात 35 रुपये किलो दरात विक्री होणाऱ्या कांद्याचे दर पुन्हा 52 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. परदेशी कांद्याचे सध्या दोन कंटेनर आवक बाजारात होत आहे. सोमवारी नाशिक, नगरवरून येणाऱ्या 106 गाड्यांची आवक बाजारात झाली असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. 

नवीन कांदा जोपर्यंत बाजारात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहतील. शेतात माल उपलब्ध नाही. त्यात परदेशी मालाला उठाव नाही. त्यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. 
- सुरेश शिंदे, कांदा-बटाटा व्यापारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT