thift 
मुंबई

काय सांगता ! सोन्याच्या बांगड्या नाही तर प्रवासी बॅग घेऊन चोरट्यांचा पोबारा...

सकाळवृत्तसेवा

श्रीवर्धन : एकट्याच राहणाऱ्या वयस्कर महिलेला बांधून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 29 एप्रिल रोजी श्रीवर्धनमध्ये घडली. या वेळी चोरट्यांनी केवळ प्रवासाची बॅग घेऊन पळ काढला. 

इब्राहिम फकी यांच्या घरी ही महिला राहण्यास आहे. 29 एप्रिलला रात्री 8.30 वाजता चोरट्यांनी घराचे दार उघडे पाहून प्रवेश केला. त्यानंतर महिलेला बांधून तिच्या तोंडात कापडाचा बोळा भरला आणि पैशांची मागणी केली. महिलेने हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घ्यायला सांगितले; परंतु चोरट्यांनी त्या घेण्यास नकार दिला. त्यानंतर घरातली कपाटे, बॅगा व विविध ठिकाणी कुठे पैसे आहेत का? हे पाहण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना कोठेही पैसे आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी एक प्रवासी बॅग घेऊन तेथून पोबारा केला. 

याप्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक खिरड, पोलिस हवालदार तुकाराम महाडिक, पोलिस नाईक जयेंद्र पेडवी करत आहेत.

Only passenger bags carried by thieves, read detail story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Building Collapse: मुसळधार पावसात मुंबईमध्ये भीषण दुर्घटना! इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू; अनेक जण दबले, बचावकार्य सुरू

Women's T20 World Cup वर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व! इंग्लंडला फायनलमध्ये पराभूत करत तब्बल सातव्यांचा 'चॅम्पियन'

Lonavala Schools Shut: लोणावळ्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट; नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना ६ जुलैला सुट्टी

Lonavala Heavy Rain: लोणावळ्यात ३६ तासांत ४४० मिमी पाऊस; कार्ला फाटा-एकवीरा रस्ता व सोसायट्या पाण्याखाली, नागरिकांचे मोठे नुकसान

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने राजीनामा हाती सोपवला; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT