मुंबई

Good News - धारावी चिंतामुक्त ! धारावीत 7 नवे रुग्ण...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : धारवीसह दादर-माहीम परिसरात आज केवळ 34 रुग्णांची भर पडली. धारावीत आज केवळ 7 नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या 2158 वर पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे आज ही एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. धारावीत आज 7 नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 2158 वर पोहोचली आहे. आज एकही रुग्ण दगावला नसून  मृतांचा आकडा 77 इतकाच आहे.

तर माहीममध्ये आज 18 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 902 इतकी झाली आहे. इथे मृतांचा आकडा 14 इतका आहे. दादरमध्ये आज 9 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली असून रुग्णांची एकूण संख्या ही 633 इतकी झाली आहे.  तर आजपर्यंत इथे 16 मृत्यू झाले आहेत.

धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात असल्याचे दिसते. या तीनही परिसरात मिळून आज दिवसभरात 34 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 3693 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 107 इतका आहे.

एकूणच धारावी, दादर, माहीम परिसरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील दिलासादायक  वाढ झाली आहे. आतापर्यंत दादर 258 , माहीम 362 तर धारावीत 1057 असे एकूण 1677 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

only seven new covid19 patients found in dharavi no deaths registered in this area

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Latest Marathi News Updates : ससून डॉक वाचवा; कोळी बांधवांचा हक्क जपा!

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Heavy Rain in Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; पावसामुळे नव्या खड्ड्यांची भर, मार्ग काढणेही अडचणीचे

SCROLL FOR NEXT