Sachin waze File photo
मुंबई

अँटेलिया जिलेटीन प्रकरण : सचिन वाझेवर होणार हृदय शस्त्रक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अँटलिया जिलेटीन प्रकरणात (Antilia gelatine case) आरोप असलेल्या सचिन वाझेवर (Sachin waze case) गेल्या १४ दिवसांपासून जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाझेला हृदय शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे मत रुग्णालयाने व्यक्त केले आहे. त्यासाठी रविवारी त्याला जेजे रुग्णालयात आणले जाणार असून उपचारादरम्यान वाझेची पत्नी मोहिनीला सोबत रुग्णालयात राहण्याची परवानगी मिळाली आहे.

सचिन वाझे प्रकरणावर विशेष न्यायालयात सोमवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. तसेच आरोपी सचिन वाझेची २ दिवस आणि दुसरा आरोपी सुनील मानेची ५ दिवसांची पोलिस कोठडीची मागणी एनआयएने केली आहे. तपास करताना एनआयएला अन्य एका संशयित आरोपीचा सहभाग निदर्शनास आला असून तो या कटामागील मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. वाझे आणि सुनिल या दोघांनाही घटनेवेळी तो मार्गदर्शन करत असल्याचे पुरावे एनआयएला मिळाले असून तो कोण आहे याची माहिती घेण्यासाठी दोघांचा ताबा एनआयए मागत आहे.

दोन्ही आरोपी न्यायलयीन कोठड़ीमध्ये गेल्यानंतर एनआयने पाच इतर आरोपींना अटक केली. त्यामाध्यमातून बरीच माहिती समोर आली आहे. प्रदीप शर्मा, सतीश मोतकरी, मनीष सोनी, संतोष शेलार, आनंद जाधव अशी या पाच आरोपींची नावे आहेत. यासंदर्भातच वाझे आणि सुनिल या दोन्ही आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी एनआयएने दोघांचाही ताबा मागितला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. त्यानंतर या गाडीचा मालक असलेल्या मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. या धक्कादायक प्रकारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अंबानी प्रकरणातील तपास अधिकारी IO सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर एनआयएने त्या दिशेने तपास केल्यानंतर सचिव वाझेंना अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT