मुंबई : मुंबईत शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्भूमीवर 12 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने "ऑपरेशन ऑल आऊट" हे विशेष अभियान मुंबई पोलीसांकडून राबविण्यात आले.
मुंबई शहरातील सर्व 5 हि प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त तसेच अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, 14 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा / सुरक्षा, 28 विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, अंमलदारामार्फत मुंबई शहरात ऑल आऊट मोहिमेत सहभागी झाले. कार्यवाही केली.
अभियाना दरम्यान केलेली कारवाई
• मुंबई शहरात एकुण 229 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले,रेकॉर्डवरील 1640 आरोपीची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये 355 आरोपी सक्रिय असल्याचे समजले. त्यांच्यावर कायद्याप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे.
• अमलीपदार्थ विरोधी कायदा अन्वये एकुण गुन्हे दाखल करून 101 आरोपी अटक करण्यात आले
• तडीपार केलेले आरोपी तपासण्यात आले असून एकूण 26 आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले.
• तुरुंगातून पेरोलवर बाहेर आलेल्या एकणू 109 आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
• बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने हॉटेल, लॉजेस्, मुसाफिरखाने असे एकूण 933 आस्थापने तपासण्यात आल्या. तसेच मुंबईतील संवेदनशील अशा एकूण 605 ठिकाणांची तपासणी करण्यात आली.
• सर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एकुण 113 ठिकाणी नाकाबंदी आयोजित केली. यादरम्यान 7768 दुचाकी /चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये 2515 वाहन चालकावर कारवाई करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.