Grand Hyatt Sakal
मुंबई

INDIA आघाडीची बैठक सुरू असलेल्या 'ग्रँड हयात' हॉटेलमधील रुमचं एका दिवसाचं भाडं किती?

नेत्यांच्या सोयीसाठी ग्रँड हयातमध्ये १९७ खोल्या बुकिंग केल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची आज आणि उद्या मुंबईत बैठक होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून या बैठकीमध्ये देशातील ११ राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेक विरोधीपक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.

इंडिया आघाडीतील नेत्यांनी या बैठकीसाठी मोठा खर्च केल्याचा आरोप शिंदे गटातील नेत्याकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर देशभरातील नेत्यांच्या सोयीसाठी ग्रँड हयातमध्ये १९७ खोल्या बुकिंग केल्याची माहिती मिळाली आहे. तर हे संपूर्ण हॉटेल २५० खोल्यांचे आहे.

जवळपास ८० टक्के खोल्या इंडिया आघाडीकडून बुकिंग करण्यात आल्या आहेत. पण या खोल्यांचे एका दिवसांचे भाडे किती आहे यासंदर्भात आपल्याला माहिती आहे का? चला तर या खोल्यांचे भाडे जाणून घेऊयात...

ग्रँड हयात या हाॅटेलच्या वेबसाईटवर खोल्याची किंमत पुढील प्रमाणे

  • या हॉटेलमधील प्रत्येक 1 bed खोलीचे एका रात्रीचे भाडे अंदाजे १५ हजार ५०० इतके आहे. यामध्ये नाश्त्याचा सुद्धा सामावेश आहे.

  • 2 bed खोलीची किंमत अंदाजे १५ ते २० हजार आहे. नाशत्यासह

  • 3 bed खोलीची किंमत अंदाजे ३१ ते ३७ हजार इतकी आहे. नाशत्यासह

  • 4 bed खोलीची किंमत अंदाजे ५२ हजार ते ५७ हजार इतकी आहे. नाश्ता व जेवणासह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT