Mumbai  
मुंबई

Mumbai : टाऊनशिपसाठी मुद्रांक शुल्क माफीला विरोध! एका बांधकाम व्यावसायिकासाठी निर्णय घेतल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दि २३ जून २०२३ रोजी राज्य सरकारने टाऊनशिपमध्ये स्थावर मिळकत खरेदी घेणा-यांसाठी मुद्रांक शुल्कात सवलती दिली, त्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात दुरुस्ती केली. त्यानुसार टाऊनशिपसाठी जमीन खरेदी करणा-यासाठी अथवा टाऊनशिपमध्ये स्थावर मालमत्ता खरेदीदारांना मुद्रांक शुल्कात माफी, सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

विशिष्ट बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी गोर-गरिब, सामान्य नागरिकांना वेठीस धरुन त्यांच्याकडून जादा कर वसुली सुरु असल्याची टीका लोकसंघर्ष पक्षाने केली आहे.

पक्षाने घेतलेल्या आक्षेपानुसार, एखादया विशिष्ट बांधकाम व्यावसायिकांच्या लाभासाठी राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय जुलमी असून टाऊनशिपसाठी जमीन खरेदी करणा-यासाठी किंवा टाऊनशिपमध्ये स्थावर मिळकत खरेदारांना याचा फायदा होणार आहे. मात्र इतर सर्व प्रकारच्या व्यवहारांना मात्र ७% मुद्रांक शुल्क लागू राहणार आहे.

विकासक अथवा टाऊनशिपमध्ये स्थावर मिळकत खरेदी करणारी व्यक्ति काय उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करणार नाही का? असा सवाल लोकसंघर्ष पक्षाचे प्रवक्ते ऍडव्होकेट योगेश मकना यांनी केला आहे. या सवलतीचा निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शासन निर्णय काय?

महाराष्ट्र सरकारने २० जून २०३० रोजी काढलेल्या शासन आदेशान्वये, टाऊनशिप प्रकल्पांसाठी जमीन मालकाकडून जमीन खरेदी करण्याकरिता खरेदीसाठी विक्री कराराच्या प्रकल्पातील वापरकर्त्यांच्या अधीन असलेल्या किंवा अभिहस्तांतरणाच्या व्यवहाराच्या संलेखाकरिता मुद्रांक शुल्क माफी किंवा कपात लागू करण्यात आली आहे.

ही माफी किंवा सवलत नगर विकास विभाग आणि नियोजन प्राधिकरणाने प्रकल्पाच्या दिलेल्या मंजुरीमध्ये ठरवून दिलेला कालावधी पूर्ण होईपर्यंत उपलब्ध राहील. यामध्ये नगर विकास विभागाने सक्षम प्राधिकाऱ्याकडून "विशेष वसाहत प्रकल्प" म्हणून अधिसूचित केलेले प्रकल्पही या आदेशान्वये मुद्रांक शुल्क माफी किंवा सवलतीसाठी पात्र असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT