Mumbai Latest Marathi News, Monsoon Latest News, Mumbai rains news Sakal
मुंबई

मुंबईला १४ जुलैपर्यंत ऑरेंज अ‍ॅलर्ट; 'या' जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

मुंबई शहरात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं पुढील चोवीस तास महत्वाचे ठरणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात मॉन्सून आता सर्वदूर पसरला असून जवळपास सर्वच भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, मुंबईत येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला असून १४ जुलैपर्यंत ऑरेंज अॅलर्टही जाहीर करण्यात आला आहे. (Orange alert to Mumbai till July 14 a torrential downpour in ten districts in next three hours)

थोड्याशा पावसानंही मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचतं. यापार्श्वभूमीवर पुढील चोवीस तास मुंबईसाठी महत्वाचे असणार आहेत. कारण या काळात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सर्वसाधारण ते अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. इथं अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. (Mumbai Latest Marathi News)

मुंबईत मुसळधार पावसाबरोबरच सध्या ४० ते ५० किमी प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या तीन-चार तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथे, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या दहा जिल्ह्यांमध्ये साधारण ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अटकेनंतर पोलिसांसमोरच आरोपींनी मिश्यांना दिला पीळ, गुन्ह्याचा अभिमान असल्याचा अविर्भाव; चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नाही, VIDEO VIRAL

IND vs AFG Test: IPL संपलं, आता टीम इंडिया लागली कसोटीच्या सरावाला; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहाणार सामना?

मेरी नजर दिवानी... 'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्री पडली प्रेमात; शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो; कलाकारांचा शुभेच्छांचा वर्षाव

Ulhasnagar: उपचारासाठी रात्रभर धावपळ, पण वाचवता आलं नाही; एनआयसीयू अभावी चिमुकलीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : अंजुरफाटा रेल्वे परिसरातील २५८ झोपड्यांवर बुलडोझर

SCROLL FOR NEXT