मुंबई

आज ११ वाजल्यापासून सर्वसामान्य महिला करणार लोकलने प्रवास

प्रशांत कांबळे

मुंबईः  आजपासून सर्व महिलांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे.  सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर महिलांना प्रवास करता येईल. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करत या विषयी माहिती दिली आहे. मुंबईत प्रवास कोंडीने  दमलेल्या महिलांसाठी ही खरंच एक आनंदाची बातमी आहे.  गेल्या पाच दिवसांपासून राज्य सरकार आणि रेल्वे खात्यात या निर्णयाबद्दल मतभेद होते. त्यानंतर मंगळवारी राज्य सरकारने पुन्हा रेल्वे मंत्रालयाला महिलांना प्रवासाची परवानगी देण्याचे पत्र पाठवले. 

मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना स.11 ते दु.3 दरम्यान आणि सायं.7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.रेल्वेची नेहमीच तयारी होती त्यामुळे आज मिळालेल्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार आम्ही त्वरित परवानगी देत आहोत. 
पियुष गोयल, रेल्वेमंत्री

महिलांसाठी ‘क्युआरकोड’चा नियम शिथील

बुधवार पासून लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना क्युआरकोड सक्ती राहणार नाही. तर राज्य सरकारने निश्चित करून दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील पुरुष कर्मचाऱ्यांना मात्र  क्युआरकोडची सक्ती कायम राहणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत क्युआरकोड मिळाला नाही. अशा कर्मचाऱ्यांना आपल्या ओळख पत्रावर लोकलचा प्रवास करता येणार आहे.  

मास्क वापरण्यासाठी रेल्वेची जनजागृती

लोकल थांबत असलेल्या सर्व रेल्वे स्थानकांवर उद्घोषणाद्वारे मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. शिवाय, तिकीट तपासणीक आणि रेल्वे पोलीस, आरपीएफ यांच्याकडून सुद्धा प्रवाशांच्या तोंडावर मास्क नसल्यास त्यांना, वेळोवेळी सांगितल्या जात आहे.

विना मास्क प्रवाशांवर कारवाई होणार

रेल्वे स्थानकावर, लोकलमध्ये मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यानंतर रेल्वेअंतर्गत न्यायालयापुढे उभं करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाणार आहे.

पुरूषांना कधी

सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. मात्र या ताज्या निर्णयामुळे महिलांना सरसकट  लोकलचा प्रवास करता येणार आहे. मात्र सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील पुरुष कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे पुरुषांनाही सरसकट लोकल प्रवासाची परवानगी केव्हा मिळणार हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
 
रेल्वे विभागाचे आवाहन

  • प्रवाशांनी मास्क घालूनच रेल्वे लोकल प्रवास करावा
  • सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे
  • कोविड-19 च्या संबंधीत नियमांचे पालन करावे
  • प्रवाशांनी अनावश्यक प्रवास टाळावा
  • ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनी शक्यतो प्रवास टाळावा

------------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Ordinary women will travel by local from 11 am today Mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT