मुंबई

...अन्यथा खाजगी वीज कंपन्यांना झटका देऊ; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

तेजस वाघमारे


मुंबई : लॉकडाउनच्या कालावधीत वीज कंपन्यांनी राज्यातील जनतेला पाठवलेल्या भरमसाठ वीज बिलांना विविध राजकीय पक्षांकडून विरोध होत असतानाच या प्रश्नामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. जनतेला पाठविण्यात बील प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालून वीजबिलात तात्काळ सूट द्यावी आणि कंपन्यांना याबाबत आदेश द्यावेत अन्यथा खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला आहे.

खाजगी वीज कंपन्यांसह महावितरण, बेस्ट या सगळ्या कंपन्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीजग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याचे बिल पाहून सामान्य माणसाचे डोळे पांढरे झाले आहेत. तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावी लागेल, असे पत्रात म्हंटले आहे. टाळेबंदीमुळे व्यावसायिक आस्थापने गेली 3 महिने बंद होती तरीही त्यांना सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अव्वाच्यासवा बिले आकारली गेली आहेत.
कोरोनाची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि भविष्यात देखील राहतील पण ह्या अशा विषयांत जनता आणि राज्यातील नवनिर्माण सेना गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने करून घेऊ नये, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

-------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : जनगणनेला नकार देणाऱ्या ८०० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT