मुंबई

अमृता फडणवीसांच्या 'बिगडे नवाब' टि्वटला निलोफर मलिकने दिले उत्तर

'काळी कमाई आणि जावयाला वाचवणं एवढच यांच लक्ष्य आहे'

दीनानाथ परब

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab malik) आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यात सध्या ड्रग्ज (Drugs) आणि अंडरवर्ल्ड संबंधांवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन, नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood ibrahim) माणसांकडून कुर्ल्यात तीन एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप केला. त्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देताना आज हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला.

दरम्यान काल अमृता फडणवीस यांनी टि्वट करुन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांना 'बिगडे नवाब' म्हटलं. प्रत्येकवेळी पत्रकार परिषद घेऊन खोट्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. काळी कमाई आणि जावयाला वाचवणं एवढच यांच लक्ष्य आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी केली.

अमृता फडणवीस यांच्या या टीकेला आता नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक यांनी उत्तर दिलं आहे. कपाटामध्ये लपवलेले सांगाडे नसतील, तर त्यांना पत्रकार परिषदेची चिंता वाटणार नाही. जेव्हा तुमची सत्याची बाजू असते, तेव्हा क्वचितच तुम्हाला भीती वाटते. त्यांचा द्वेषपूर्ण हेतू असेल, तर ते उघडे पडतील. महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हाच आमचा ध्यास आहे, असं निलोफर मलिक यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी घेतलेल्या वेगवेळ्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी ड्रग्जशी संबंधीत असलेल्या एका व्यक्तीसोबत उभ्या असलेल्या अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर करत त्यांच्यावर आरोप केले होते. तेव्हा अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup : एका राजाने निवडला संघ... खेळाडूंवरील गुन्हे माफ अन् इंग्लिश तेल कंपनी बंद पाडण्याची धमकी; १९३० च्या वर्ल्ड कपचा रंजक किस्सा तुम्ही ऐकला नसेल...

Donald Trump Team Split: इराण करारावरून ट्रम्प यांच्या प्रशासनात फूट; सीआयएच्या गुप्त अहवालामुळे अमेरिकेची उडाली झोप

Broiler Chickens Death : एका रात्रीत पोल्ट्रीमधील सुमारे 3600 बॉयलर कोंबड्यांचा अचानक मृत्यु; सुमारे सात लाखाचे नुकसान, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज

Jawan Pravin Avhade : कन्यारत्नाच्या आनंदावर विरजण; जवान प्रवीण आव्हाड यांचे अपघाती निधन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेच्या २४ उमेदवारांना नोटीस, निवडणुकीचा हिशोब न दिल्याने कारवाई

SCROLL FOR NEXT