Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray 
मुंबई

मुंबईत कोरोना नियंत्रणाच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलं पत्र

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या (covid situation is in mumbai) मागच्या काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. लॉकडाउनच्या उपायोजनेमुळे हे शक्य झाल्याचे चित्र महाविकास आघाडी सरकारकडून रंगवण्यात येत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असेल, तरी प्रत्यक्षात पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. पण आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी, मुंबईत रुग्णसंख्या कमी होत असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Over covid situation is undercontrol in mumbai devendra fadnavis write letter to cm uddhav thackeray)

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. "मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होणे" असे मुद्दे देवेंद्र फडणीस यांनी पत्रातून मांडले आहेत.

"मुंबईतील कोरोना स्थिती प्रशासकीय उपायोजनेमुळे नियंत्रणात आल्याचे आभासी चित्र निर्माण केले जातेय. प्रत्येकवेळी आभासी चित्र उभे करण्यासाठी पीआर कंपन्या आणि सेलिब्रिटींचा वापर केला जातो, हे दुर्देवी आहे" असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्यावतीने होत आहे. मुंबईत आरटीपीसीआर चाचण्याची १ लाखाची क्षमता आहे. पण सध्या केवळ ३४,१९१ इतक्या चाचण्या प्रतिदिन केल्या जात आहेत. त्यातही ३० टक्के चाचण्या रॅपिड अँटीजेन प्रकारातील आहेत" याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay Support AIADMK : तामिळनाडूत महाराष्ट्रासारखी फूट! आण्णा द्रमुकचे दोन भाग; थलपती विजयला थेट पाठिंबा

Pune Grand Tour: ‘पुणे ग्रँड टूर’चे रस्तेही खराब; १६५ कोटींचे काम खोदाईमुळे वाया, नियमांचे उल्लंघन, काम पूर्ण होऊनही दुरुस्ती नाही!

'नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न केले, पण…' ‘कमळी’ फेम अभिनेत्रीने सांगितला बाळंतपणाचा अनुभव, म्हणाली... 'त्या क्षणी खूप रडले…'

PM मोदींनी केलेल्या अचानक घोषणे बद्दल काय आहे शरद पवारांचे मत? केली मोठी भविष्यवाणी

Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

SCROLL FOR NEXT