raj-uddhav  file photo
मुंबई

मुंबई मॉडेलच्या श्रेयावरुन मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकारचं श्रेय हे कसं काय?

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्या कमी होत आहे. कोरोना स्थिती (covid situation) नियंत्रणात येतेय. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 163 दिवसांवर आला आहे. लॉकडाउनच्या निर्णयामुळे कोरोनास्थिती नियंत्रणात आल्याचा सरकारचा दावा आहे. मुंबईत ऑक्सिजनपासून ते बेडपर्यंत ज्या पद्धतीने कोविडचं व्यवस्थापन झालं, त्या मॉडेलचं (mumbai model) सर्वत्र कौतुक होत आहे. (over mumbai model mns leader sandeep deshpande slam thackeray govt)

या मुंबई मॉडेलचं श्रेय घेण्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवीन सामना रंगण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुंबई मॉडेलच्या श्रेयाच्या मुद्यावरुन एक टि्वट केलं आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रश्न विचारताना ठाकरे सरकारवरही टीका केली आहे. "रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार कमी झाली की सरकार, अशी दुटप्पी भूमिका कशी घेता?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

मुंबईत काल 1794 नवीन रुग्ण सापडले, तर 3580 रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर कमी होऊन 0.41 टक्क्यांवर खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी ही कमी होऊन 163 दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai covid situation) नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे. मृतांचा आकडा कमी झाला नसून काल ७४ रुग्णांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT