Raj Thackray Uddhav Thackray 
मुंबई

'शिवाजी पार्कसाठी दिवे इटलीतून आयात करणं हा योगायोग की लांगुलचालन?'

मध्यंतरी मनसेने शिवसेनेला उचलेकरांचा पक्ष म्हटलं होतं.

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात (shivaji park ground) विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री निधीतून हे रोषणाई साकारण्यात आली आहे. आता याच मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (mns) शिवसेनेवर (shivsena) निशाणा साधला आहे. यापूर्वी सुद्धा शिवाजी पार्क मैदानाच्या सुशोभिकरणाच्या मुद्यावरुन शिवसेना आणि मनसेमध्ये शाब्दीक सामना रंगला होता. दोन महिन्यांपूर्वी शिवाजी पार्क सुशोभिकरणाच्या मुद्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी शिवसेनेला उचलेकरांचा पक्ष म्हटलं होतं.

शिवाजी पार्क भागात मनसेच्या संकल्पनांची शिवसेना कॉपी करत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला होता. शिवाजी पार्क मैदान शिवसेना आणि मनसे दोघांसाठी महत्त्वाचं आहे. ऐतिहासिक घडामोडींचे साक्षीदार असलेल्या या मैदानाशी दोन्ही पक्षांची भावनिक नाळ जोडलेली आहे.

शिवसेनेच्या स्थापनेची पहिली भव्य सभा १९६६ मध्ये यांच मैदानावर झाली होती. मनसेच्या स्थापनेची ही पहिली सभा याच मैदानात पार पडली होती. मध्यंतरी इथे आमदार आणि नगरसेवक मनसेचे होते. त्यावेळी त्यांनी आपल्या निधीतून शिवाजी पार्कची शोभा वाढवण्यासाठी अनेक काम केली होती.

आता राज्यात सत्तेवर असलेली शिवसेना मुख्यमंत्री निधीतून इथे काम करत आहे. त्यावर मनसेने निशाणा साधला आहे. शिवाजी पार्क मैदानात विद्युत रोषणाईचे दिवे इटलीतून आयात करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. दिवे हे इटली मधून आयात करणं हा योगायोग आहे की, इटली चं लांगुलचालन? असा सवाल मनसेने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT