मुंबई, ता. 24 - लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळा येत आहे. बाहेरच्या सर्व ऍक्टिव्हिटीज बंद आहे. त्यामुळे मनावर ताण येतोय. यातून मार्ग काढण्यासाठी काही नृत्य क्लासेसने ऑनलाईन शिकवणी सुरू केली आहे. प्रसिद्ध नृत्य कलाकार स्वतःचे व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यातून दिवसभर मनावर आलेला ताण कमी होतो.
कथ्थक नृत्य कोडिओग्राफर मयुर वैद्य यांनी लॉकडाऊनच्या काळात आपल्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केले. तर प्रसिद्ध कोडिओग्राफर फुलवा खामकरने ही आपले क्वारंटाईनमधील व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केले अभिनेत्री कथ्थक नृत्यांगणा तन्वयी पालवने आपले कथ्थक नृत्याचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. यातून लोकांचे घरबसल्या मनोरंजन होत आहे. तर दुसरीकडे पाश्चिमात्य नृत्यांचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. यामध्ये झूम अॅप, स्काईपचा वापर करून नृत्य शिकवले जाते.
बोरिवली येथील कथ्थक नृत्यागंणा मनिषा पात्रिकर आपल्या विद्यार्थ्यांचे कथ्थकचे स्काईपद्वारे ऑनलाईन क्लासेस घेण्यास सुरुवात केली. त्यांचे एकूण पारंभिक ते विशारद असे एकूण 40 विद्यार्थी आहेत. प्रत्येकाच्या बॅचनुसार ऑनलाईन क्लासचे दिवस आणि वेळा ठरवल्या आहे. त्याप्रमाणे विद्यार्थी ऑनलाईन कथ्थक शिकतात. याबद्दल त्या म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे क्लास बंद झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नृत्यांतील शिकवणीत आणि सरावात खंड पडला. मग ऑनलाईन क्लास घेयची कल्पना सुचली. विद्यार्थ्यांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला.
प्रत्यक्ष क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणे व ऑनलाईनमध्ये शिकवणे यात खूप फरक आहे, तेवढे बारकाईने लक्ष ऑनलाईमध्ये देता येत नाही. नृत्यांच्या परिक्षाही असतात. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे ऑनलाईन क्लास पर्याय उपयुक्त ठरतो. तसेच कथ्थक नृत्याच्या परिक्षेमध्ये लेखी परिक्षा असते. त्याचा सराव ऑनलाईन क्लासद्वारे होतो, असे मनिषा पात्रिकर यांनी सांगितले.
पात्रिकरण यांच्या विद्यार्थी स्नेहल दाते यांना ऑनलाईन शिकण्याचा अनुभव सांगितला, लॉकडाऊमुळे कुठेच जाता येत नाही. घरात बसून वेळ कसा घालवायचा याचा प्रश्न पडतो. ऑनलाईन क्लास सुरू झाले. नृत्य साधनेत खंड पडत नाही. एक दोन तास ऑनलाईन नृत्य शिकण्यात सहज निघून जातात. नुसते घरात बसून जो मनावर ताण येतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी ऑनलाईन नृत्य शिकणे हा माझ्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. नृत्य हे व्यायामासोबत , तणाव मुक्त करण्याचे एक उत्तम साधन आहे.
to overcome mental stress lot of people are taking online dance classes
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.