मुंबई

दवाखाना नको रे बाबा! घरीच करतो तपासणी! ऑक्सिमीटर, थर्मामीटरसाठी सर्वाधिक गूगल सर्च

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ; लॉकडाऊनच्या काळात  रुग्णालयात जाणे टाळण्यासाठी लोक घरीच आपल्या तब्येतीची काळजी घेत असल्याचे चित्र आहे. शिवाय सौम्य लक्षणे असणाऱ्या कोविड रुग्णांना घरातचं राहण्याच्या निर्णयानंतर आरोग्य तपासणीसाठी लागणाऱ्या वैद्यकीय वस्तूंची मागणी वाढली आहे. गेल्या सहा महिन्यापासून  ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड ते  थर्मामीटर, इनहेलर सारख्या  वस्तूंच्या खरेदीत सातत्याने वाढ होत आहे.

लॉकडाऊन काळात लोक घरीच आरोग्याची नियमीत तपासणी करण्यासाठी थर्मामीटर सारख्या वस्तूंची जोरात खरेदी करत आहेत.  गेल्या 6 महिन्याच्या काळात ऑक्सिमीटरच्या मागणीत 23 टक्के ; तर शरिराचे तापमान मोजण्यासाठीच्या इन्फारेडच्या मागणीत 26 टक्के वाढ झाली आहे. फ्लिपकार्टने ही माहिती दिली आहे. रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर केला जातो.

मे महिन्याच्या तूलनेत जून महिन्यात  पल्स ऑक्सिमीटरचा खप 15 पटीने वाढला आहे.  1mg या ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनूसार त्यांच्या स्टोअर्समध्ये  मे महिन्यात ग्लूकोमीटरच्या मागणीत 90 टक्के एवढी वाढ नोंदवली गेली ; तर इनहेलरच्या मागणीत 80 टक्के वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. मागणी अचानक वाढल्याने पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याची कबुली कंपनीने दिली आहे.

या काळात प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधांनाही मोठा प्रतिसाद मिळतोय. गेल्या तीन महिन्यापासून या औषधांच्या मागणीत महिन्याकाठी 20 टक्क्याने  वाढ होत आहे.चव्यनप्राश, काढा, अश्वगंधा या सारख्या औषधांची खरेदी 25 टक्क्याने वाढली आहे. महत्वाचे या विभागातील कुठल्याच औषधाची मागणीमध्ये घट झालेली नाही. 

कोव्हिड संसर्गामुळे शरिराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामिटर आणि स्कॅनर मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. विषेशता थर्मल स्कॅनरला जास्त  मागणी फ्लिपकार्टच्या प्रवक्यांनी म्हटले आहे.


 

ऑक्सिमीटरसाठी सर्वाधिक गूगल सर्च 

ऑक्सिमीटरसाठी मे महिन्यापासून गूगल सर्चींग सुरु झाला. जून महिन्यात सर्वाधिक म्हणजे 100 टक्के सर्च ऑक्सिमीटरसाठी होत आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यात ऑक्सिमीटरसाठी सर्च करण्यांची संख्या जास्त आहे.
22 जूनपर्यंत ऑक्सिमीटरच्या सर्चने हँड सॅनिटायजरला मागे टाकले आहे. तर थर्मल स्कॅनरसाठी मे  महिन्यातचं 100 टक्के गूगल सर्च केला गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT