अभिजित पवार, प्रवर्तक, श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम Sakal
मुंबई

Paduka Darshan Sohala 2024: बुद्धीची वृद्धी, मनाची मशागत, जीवनाची समृद्धी

‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅमची संकल्पना ‘एखाद्या व्यक्तीला आयुष्यात गुरू असावा’ या कालातीत तत्त्वानं प्रेरित आहे. गुरू आपली काळजी घेतो, आयुष्यातल्या चढ-उतारांच्या वाटचालीत मार्गदर्शन करतो. आपल्याप्रती त्याच्या मनात निरंतर सद्‍भावनाच असते. गुरूनं दिलेल्या विवेक, पाठबळ, प्रोत्साहनामुळेच जीवनाची वाटचाल सुखकर होते. त्याच्या आधारानंच स्वाभिमानानं आणि आत्मविश्वासानं जगता येते.

Abhijit Pawar

प्रिय वाचक,

‘सकाळ माध्यम समूहा’चा व्यवस्थापकीय संचालक आणि ‘एपी ग्लोबाले’ या बहुउद्देशीय कंपनीचा संस्थापक म्हणून कार्यरत असताना माझा ओढा नेहमीच ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेवर आहे. सध्याचं जग एवढं गोंधळलेलं आणि घाईगडबडीचं झालं आहे की, मार्गदर्शन आणि पाठबळाखेरीज जगणंच कठीण झालं आहे. एरवी आपला समाज कितीतरी जटिल समस्यांना तोंड देत असतो. वाढता तणाव आणि तुटलेपणाची जाणीव तर आहेच, परंतु आर्थिक असुरक्षितता आणि आरोग्याच्या कटकटींनीही आपलं जगणं ग्रासून गेलं आहे.

कुटुंबांना आनंद, आरोग्य आणि समृद्धीची व त्यांच्या आयुष्यातील सर्व घटनांना सामावून घेणाऱ्या रोडमॅपची आज सर्वाधिक गरज आहे. माझा विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या व त्याच्या कुटुंबाच्या सक्षमीकरणातून सकारात्मक बदल घडून येतील व ते फक्त त्या व्यक्ती किंवा कुटुंबापुरतेच मर्यादित न राहता सर्वदूर पोहोचतील आपण सगळे मिळून नक्कीच एक सुदृढ, आरोग्यदायी आणि समृद्ध समाज घडवू शकतो, जिथे प्रत्येक कुटुंबाला आनंदी, समाधानी होण्याची संधी असेल. नेमकी हीच गरज भागविण्यासाठी ‘श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम’चे प्रयोजन आहे.

या प्रोग्रॅमद्वारे कुटुंबांना जीवनशिक्षण देणारी यथायोग्य सामग्री, स्रोत आणि प्रेरणा देता येईल. या पाठबळाच्या जोरावर त्यांचं संपूर्ण जीवनच सार्थक होईल. आध्यात्मिक दृष्टिकोन, आरोग्याचे मंत्र, आर्थिक सुबत्तेसाठीचा सल्ला आणि सेवाभावाचीही संधी मिळेल. थोडक्यात, ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅम सर्वसमावेशक असून, त्यातून संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होणार आहे.

‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅमची संकल्पना ‘एखाद्या व्यक्तीला आयुष्यात गुरू असावा’ या कालातीत तत्त्वानं प्रेरित आहे. गुरू आपली काळजी घेतो, आयुष्यातल्या चढ-उतारांच्या वाटचालीत मार्गदर्शन करतो. आपल्याप्रती त्याच्या मनात निरंतर सद्‍भावनाच असते. गुरूनं दिलेल्या विवेक, पाठबळ, प्रोत्साहनामुळेच जीवनाची वाटचाल सुखकर होते. त्याच्या आधारानंच स्वाभिमानानं आणि आत्मविश्वासानं जगता येते.

आपले आयुष्य सुख, समाधान आणि शांतीनं जगता यावं, यासाठी असा कुणीतरी पथदर्शक, वाटाड्या प्रत्येकाला मिळायला हवा. किंबहुना तो प्रत्येकाचा हक्कच आहे. ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅमच्या माध्यमातून असा वैयक्तिक गुरू किंवा सखा किंवा वाटाड्या प्रत्येक कुटुंबाला लाभावा, असा आमचा उद्देश आहे. तावून सुलाखून, पारखून अनुभवलेली शिकवण, विशेषत्वाने तयार केलेले स्वाध्याय आणि अभ्यासक्रम, प्रात्यक्षिकांची सामग्री आणि प्रगतीच्या अनेक संधींसह हा प्रोग्रॅम राबवला जाणार आहे. आध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीतला तुमचा एक विश्वासू साथीदार या नात्याने आम्ही तुमच्या सोबत राहू इच्छितो. आध्यात्मिक मार्गदर्शन हवं असल्यास किंवा कोणताही व्यावहारिक सल्ला हवा असल्यास किंवा थोडीशी प्रेरणा हवी असल्यास

‘श्री फॅमिली गाईड’ तुमच्या पाठीशी प्रत्येक पावलावर उभा असेल.

अध्यात्म, आरोग्य, आणि संपत्ती व्यवस्थापनातील नामांकित शिक्षक, प्रशिक्षक, विचारवंत आणि तज्ज्ञांची अचूक शिकवण ‘श्री फॅमिली गाईड’च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. अर्थात, कुठल्याही सामान्य पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाच्या किंवा कुठल्याही वयाच्या व्यक्तीच्या पचनी पडेल, अशीच तज्ज्ञांच्या सक्षम चाळणीतून आलेली ही शिकवण असेल. प्राचीन आध्यात्मिक परंपरांपासून आधुनिक आरोग्यतंत्र आणि योग्य आर्थिक व्यवहार ज्ञानापर्यंत जगण्यासाठी लागणाऱ्या सर्वच गोष्टींचा अंतर्भाव ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅममध्ये आहे.

आमचा हा प्रोग्रॅम उत्तम जीवनशिक्षण देईल आणि त्यासोबत आवश्यक ती अभ्यासक्रमाची सामग्री, विविध उपक्रम, विशेषत्वाने निर्माण केलेला आशय अशा अनेक गोष्टींनी तो युक्त असेल. त्यायोगे एखाद्याला आपल्यातच सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येईल. स्वतःमध्ये सुधारणा करता येतील. व्यक्तीनुरूप किंवा कुटुंबाच्या गरजांनुरूप आर्थिक आणि आध्यात्मिक उन्नतीच्या संधी देणारं हे एक व्यासपीठच असेल. विविध स्वरूपांच्या कार्यशाळा, वेबिनार्स किंवा ऑनलाइन अभ्यासक्रम यांनी परिपूर्ण असा ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅम आहे.

कुटुंब आणि समाजाशी विधायक नातेबंध जोडून एकात्मतेनं उन्नती साधणं हा तर ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅमचा आत्मा आहे. या प्रोग्रॅमचा एक भाग सेवाभावाचा आहे. सेवा हे कर्मयोगानं सांगितलेलं तत्त्व. सेवाभावी उपक्रमांमध्ये आपला वाटा उचलून समाजाप्रती थोडीफार परतफेड करण्याची उदात्त भावना अनेकांमध्ये असते. ती संधी ‘श्री फॅमिली गाईड’ देईल. समाजाप्रती कृतज्ञ असणं, सहवेदना-सहानुभावाला प्रोत्साहन देणं, याद्वारे एक सकारात्मक परिणाम निश्चित साधता येतो. त्यासाठी खराखुरा गुरुसेवक होता आलं पाहिजे. जीवनाचे शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक या सर्वच पैलूंमधूनच परिपूर्ण आरोग्य आकारास येते, अशा माझी ठाम भावना आहे.

‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅममध्ये नोंदणी केल्यानंतर तुम्ही अशाच सकारात्मक परिवर्तनाच्या प्रवासाला प्रारंभ कराल. हा प्रवास तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना अधिक मोठ्या आनंदाकडं, आरोग्याकडं आणि समृद्धीच्या दिशेनं नेणारा आहे.

या परमानंदाच्या, आरोग्याच्या आणि समृद्धीच्या प्रवासासाठी मी तुम्हाला आमंत्रित करीत आहे. या, आपण सारे मिळून आपल्या भावी पिढ्यांसाठीच्या उज्ज्वल भवितव्याची मुहूर्तमेढ करूयात...

कृतज्ञता आणि शुभेच्छांसह

अभिजित पवार, प्रवर्तक, श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT