आर. बी. हाेले यांच्या कलाकृती
आर. बी. हाेले यांच्या कलाकृती 
मुंबई

ठाण्यातील चित्रकाराची कलाकृती जपानमध्ये 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ठाण्यातील चित्रकार आर. बी. होले यांच्या चित्रकलाकृतींचे प्रदर्शन जपानमधील फेई म्युझियम योकोहामा येथे भरविण्यात आले आहे. इंक व पेनने साकारलेल्या काळ्या शाईतील एकूण 39 कलाकृती "इन्फिनिटी' म्हणजेच अनंत या प्रदर्शनात मांडण्यात आल्या असून जपानमधील नागरिकांनीही होले यांच्या कलेचे कौतुक केले आहे. 
होले यांची आजपर्यंत न्यूयॉर्क, लंडन, वेनीस (इटली), टूरीन (इटली), चेन्नई व मुंबई अशी देश-विदेशात आठ एकल चित्रप्रदर्शने भरली आहेत. मागील वर्षी इटलीतील त्यांचे म्युझिक ऑफ युनिव्हर्स म्हणजेच विश्वास संगीत हे चित्रप्रदर्शन गाजले होते. यंदा जपान येथे होले यांनी आपली कलाकृती मांडली आहे. 9 जुलैपासून हे प्रदर्शन जपान येथे भरविण्यात आले आहे. येत्या रविवारपर्यंत हे प्रदर्शन खुले असून जपानमधील रसिकांनी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिल्याचे होले यांनी सांगितले. 

आकाशाची भव्यता चित्रांमध्ये 
ठाणे येथे रहाणारे आर. बी. होले यांना लहानपणापासूनच चित्र काढण्याची आवड असून त्यांना आकाशाचे फार कुतूहल आहे. आकाशाची ही भव्यता, दिव्यता त्यांच्या चित्रामध्ये देखील दिसते. यावरूनच त्यांनी जपानमधील त्यांच्या प्रदर्शनाचे नावही "अनंत' असेच ठेवले आहे. संपूर्ण विश्व हे गुढतेने भरलेले असून, ही गूढमय कोडी आपल्या चित्रांद्वारे होले उलगडून सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT