Mumbai crime News 
मुंबई

Mumbai News: इन्स्टाग्रामवर पाकच्या स्वातंत्र्यदिनाचं ठेवलं स्टेटस, दोन विद्यार्थ्यांना मुंबईत अटक!

Sandip Kapde

Mumbai News:  पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे फोटो इंस्टाग्रामवर स्टेटस म्हणून पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुलाब्यातून दोन १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक केली. मुंबईतील कुलाबा पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी एका व्यावसायीकाने तक्रार केली होती.

मात्र, नंतर ताकीद देऊन दोघांनाही सोडून देण्यात आले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलाब्यातील एका व्यावसायिकाने सोमवारी पोलिसांशी संपर्क साधला आणि तक्रार दाखल केली की, परिसरातील काही मुले पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा इन्स्टाग्रामवर स्टेटस म्हणून वापर करत आहेत. यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते असे त्या व्यक्तीने सांगितले.

तक्रारीच्या आधारे, कुलाबा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सोमवारी रात्री उशिरा या मुलांचा शोध घेतला आणि त्यांना पोलिस ठाण्यात आणले आणि सीआरपीसी 151(3) अंतर्गत त्यांना ताब्यात घेतले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

यादरम्यान, पोलिसांनी त्यांचे मोबाईल तपासले आणि दोघांनीही इंस्टाग्रामवर त्यांच्या स्टोरी स्टेटस म्हणून पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या चित्राचा वापर केल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो जप्त केला. (latest marathi news)

अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या वागण्यावरून, बोलण्याच्या पद्धतीवरून असे दिसते की ते १५ ऑगस्टला देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने हे करत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT