Delta Plus Sakal
मुंबई

'पालघर'मध्ये 2 डेल्टा रुग्ण ठणठणीत! धोका वाढण्याची शक्यता..

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

वसई: पालघर (Palghar) ग्रामीण भागात कोरोनाने (Corona) थैमान घातले होते ह्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असताना डेल्टा (Delta) व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले मात्र ते ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. डेल्टाचा (Delta) धोका निर्माण होऊ नये याकरिता पालघर (Palghar) जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाले असून संशयित लक्षणे आढळल्यास त्वरित नमुने तपासणीसाठी (Cheaking) पाठविण्यात येत असून , नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून (Health Department) करण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील महिला तर व वाणगाव याठिकाणचा एक पुरुष याना डेल्टाची लागण झाली होती त्यामुळे त्यांना आरोग्य विभागाने उपचारासाठी देखरेखीखाली ठेवले होते ते पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.कोरोना चाचणी केल्यावर लक्षणांची तीव्रता पाहून 5 टक्के रुग्णांचे नमुने हे नागरिकांचे नमुने पुणे येथे पाठविण्यात येत आहेत यातूनच दोन जणांचा अहवाल समोर आला होता तर अन्य एकाच फक्त कोरोनाची लागण असल्याचे समोर आले. आरोग्य विभागाने यानंतर यंत्रणा सक्षम केली आहे.

पालघर ग्रामीण व वसई विरार शहरात मार्च, एप्रिल महिन्यात कोरोनाने थैमान घातले होते रुग्ण वाढ व मृत्यूचे प्रमाण अधिक झाले होते.कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांना उपचार घेण्यासाठी खाटांचा अभाव निर्माण झाला होता. ऑक्सिजनची कमतरता भासत होती मात्र त्यानंतर ऑक्सिजन प्लांट उभारण्याची योजना अंमलात आणली तसेच ऑक्सिजन साठा देखील पुरेशा प्रमाणात नियंत्रित करण्यात आला होता. आरोग्य यंत्रणेत डॉक्टर,कर्मचारी आदींची भरती सुरु केली .

पालघर ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे,आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे तालुकानिहाय केंद्राची उभारणी करून कोरोना चाचणीवर भर देण्यात आला आहे.त्याचबरोबर जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे. जर कोरोनाशी निगडित लक्षणे आढळली तर नागरिकांना त्वरित निदानासाठी आरोग्य केंद्रात व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे त्यातच नियम शिथिल करण्यात आल्यानंतर नागरिकांची दुकान,मॉल्ससह, सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण होईल अशी भीती आहे.त्यातच डेल्टाचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने लढा देण्यासाठी कोरोनारुग्णांचे नमुने बारकाईने तपासणीसाठी पाठविण्याचे नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT