Mumbai Sakal
मुंबई

पालघर : जिल्हा परिषद पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाच्या ज्योती प्रशांत पाटील विजयी

तर प्रतिस्पर्धी उमेदवार उन्नती सतेज राऊत (राष्ट्रवादी) यांचा 416 मतांनी पराभव केला आहे

अच्युत पाटील

बोर्डी दिनांक 6 ऑक्टोंबर अच्युत पाटील बोर्डी पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणूक बोर्डी गट क्रमांक 6 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्योती प्रशांत पाटील  (भाजप)  5283 मते मिळवून  विजयी झाल्या आहेत.

तर प्रतिस्पर्धी उमेदवार उन्नती सतेज राऊत (राष्ट्रवादी) यांचा 416 मतांनी पराभव केला आहे राष्ट्रवादीच्या उन्नती राऊत यांना 4867 मते मिळाली आहेत तर बहुजन विकास आघाडी च्या निवेदिता श्याम बारी (बवीआ) 999 मिळाली आहेत 423  मतदारांनी नोटाचा हक्क बजावला आहे ज्योती प्रशांत पाटील यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या विजयी उमेदवार होत्या परंतु न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी  तुल्यबळ उमेदवार देण्याच्या उद्देशाने मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या रूपाली सावे यांना उमेदवारी नाकारून उन्नती राऊत यांना प्रथमच उमेदवारी दिली होती निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावात तसेच मतदारसंघांमध्ये राजकारण ढवळून निघाले होते अनेक भाजप समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आल्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते मागच्या निवडणुकीत या मतदारसंघात 60 टक्के मतदान झाले होते भाजपच्या उमेदवार ज्योती पाटील यांनी एक हजार 700 मताधिक्य घेऊन विजय मिळविला होता पोटनिवडणुकीत 54 टक्के मतदान झाले असून 416 मताधिक्य घेऊन भाजपच्या उमेदवार विजय झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT