Prafull Patil Sakal
मुंबई

पालघर कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील

पालघर जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पुरता सुफडासाफ झाला असून सर्व उमेदवार पराभूत झालेत.

संदीप पंडित

विरार - पालघर जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पुरता सुफडासाफ झाला असून सर्व उमेदवार पराभूत झालेत. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वाने तत्काळ संघटनात्मक फेरबदल करत विद्यमान अध्यक्ष दिवाकर पाटील यांना पदावरून हटवले असून त्यांच्या जागेवर प्रफुल्ल पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

एकेकाळी ठाणे आणि पालघरवर राज्य करणारा काँग्रेस पक्ष जिल्ह्यात संघटनात्म पातळीवर अत्यंत कमकुवत बनला आहे. कॉंग्रेसचं वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात आता अस्तित्वच शिल्लक राहतं की नाही, अशी स्थिती आहे. नुकताच झालेल्या जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचं पानिपत झालं. त्यामुळे पालघर जिल्हा कॉंग्रेसमध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार पक्ष नेतृत्वाने कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील यांच्या नावाची घोषणा केली. पाटील हे वाडा तालुक्यातील देवघर गावाचे रहिवासी असून सरपंच ते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

देवघर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून सर्वात तरुण सरपंच म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर कुणबी सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ते वाडा पंचायत समितीचे उपसभापतीपदही त्यांनी भूषविले. तर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष, कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्षपदासह विविध पदांवर त्यांनी काम केलंय. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर कुणबी सेनेच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. एक शेतकरी आंदोलका सोबतच प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे.

पक्ष नेतृत्वाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझयावर सोपविली आहे. जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाची स्थिती पाहता सर्वात अगोदर संघटनात्मक बांधणीवर अधिक लक्ष केंद्रित करून जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष करण्याचं मोठं आव्हान आहे. केंद्रसरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर लढून कॉंग्रेसपक्ष जिल्ह्यात उभा करू

- प्रफुल्ल पाटील, जिल्हाध्यक्ष, पालघर कॉंग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कंगना रणौतविरोधात गुन्हा दाखल; सोनिया गांधींसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट , नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: लग्नसराई सुरू होण्याआधी सोन्याचे भाव कोसळले! 10 महिन्यांतील सर्वात स्वस्त सोनं; तुमच्या शहरात सोनं किती रुपयांनी स्वस्त?

NCP Merger: सुप्रिया सुळे-पटेल यांच्यात खलबते, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा जोर

Suryakumar Yadav: सूर्यकुमारच्या दुसऱ्या इनिंगची उत्सुकता ;मुश्ताक अली स्पर्धा आजपासून; आयपीएल लिलावाआधी नवोदितांना संधी

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली, रूपालीचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT