Bordi Valu Mafiya News sakal
मुंबई

Palghar Crime News: पालघर जिल्ह्यात वाळूमाफियांचा हैदोस; समुद्रकिनारा होतोय टार्गेट!

वाळू चोरांचा बोर्डीवर धुमाकूळ; समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आणि सुरक्षितता धोक्यात | Sand thieves Beach beauty and safety at risk

सकाळ वृत्तसेवा

Bordi Valu Mafiya News: पर्यटकांना भुरळ घालणारा बोर्डी गावचा निसर्ग रम्य समुद्रकिनाऱ्यावर वाळू माफीयांनी हैदोस घातला असून दररोज रात्री मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याच दिसून येत आहे. महसूल विभाग आंधळे असल्याचे ढोंग घेत असल्या मुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

बोर्डी गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध असून गावाच्या पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्राच्या किनारी सुरुची वनराई व निसर्ग रम्य समुद्रकिनारा असल्याने पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतो. हजारो पर्यटक या ठिकाणी निसर्गरम्य समुद्राचा व समुद्रकिनाऱ्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. परंतु वाळू माफियांनी या किनाऱ्या चे सौंदर्य नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. रात्रीच्या वेळी ट्रक, पिकअप व्हॅन मधून वाळूची चोरी केली जात आहे.

त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठ मोठाले खड्डे पडत आहेत. याच परिसरात शाळा कॉलेज असल्यामुळे अनेक मुलं समुद्रकिनाऱ्यावर खेळण्यासाठी जात असतात वाळू माफियांनी केलेल्या खड्ड्यामुळे मुलांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. याबाबत बोर्डीतील काही तरुणांनी महसूल व पोलीस विभागाचे लक्ष वेधले आहे. दोन्ही विभागांनी या वर कारवाई करण्याचे संकेत दिले असले तरी प्रत्यक्षात कृती होत नसल्यामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT