मुंबई

Mumbai Ahmedabad Expressway वर भीषण अपघात; चिमुरड्यावर काळाचा घाला

महेंद्र पवार

कासा - डहाणू  तालुक्यातील मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवरी गावाजवळील सूसरी नदीच्या पुलावर मुंबई (माहीम) हून गुजरात वापी या ठिकाणी शेख कुटुंब आज लग्नाला जात असताना गाडीचा टायर फुटल्याने दुपारी २ वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की,  इको गाडी चा पुर्ण  चक्काचूर झाला असून गाडीतील २ जण जागीच ठार झाले. त्यात एका 1 वर्षाच्या लहान मुलाचा समावेश आहे

.मुंबई ( माहीम )हून आज शेख कुटुंब नातेवाईकांच्या वापी येथे लग्नाला जात होते , मात्र काळाने घात घेत सुखाच्या वेळी शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गाडीत एकूण लहान मुलासह 10 जण होते त्यातील नाझनीन शेख (46वर्षे ), मुझेन शेख (1 वर्ष ) हे दोघ जागीच ठार झाले. तर शाईन नाईक (46 वर्षे ), आशिक अली (65 वर्षे ), टूबा शेख(6 वर्षे)  आतीफा शेख (9 वर्षे), जनाफ शेख (७वर्षे), जोया शेख(6)वर्षे व  ड्रायव्हर अयान नाईक (29वर्षे ) हे सर्व जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या वर कासा उपजिल्हा रुग्णालयाला उपचार चालू आहेत .

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यसाठी येथे क्लिक करा

नेमक्या  याच  वेळी  या महामार्गा  वरून  प्रहार  संघटनेचे  तालुका अध्यक्ष  रमेश  माळी व जिल्हा उपाध्यक्ष  निलेश  कासट  हे जात होते  त्यांनी तेथे  थांबून  मदतकार्य केले  जखमींना  रुग्णालयात  दाखल  करण्यासाठी  मदत केली.

palghar marathi news Terrible accident on Mumbai Ahmedabad Expressway at dhanivari

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT