Tiranga National Flag Sakal
मुंबई

पालघर जिल्ह्यात सदोष राष्ट्रध्वजाच्या वाटपाने नागरीकांमध्ये संताप

आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना देशातील प्रत्येक नागरीकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भगवान खैरनार

आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना देशातील प्रत्येक नागरीकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

मोखाडा - स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष अमृत महोत्सवी वर्षं म्हणून देशात साजरे केले जात आहे. त्यासाठी हर घर तिरंगा ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राबवली जाते आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायती ला राष्ट्रध्वज हर घर वाटपासाठी पुरविण्यात आले आहे. मात्र, हे राष्ट्रध्वज आयाता कृती नसुन अशोक चक्र ही मधोमध नसल्याने, सदोष पध्दतीचे आहेत. असेच राष्ट्रध्वज नागरीकांना वाटप केले जात आहे. तसेच एका राष्ट्रध्वजाचे नागरीकांकडुन  21 रूपये वसुल केले जात आहेत. त्यामुळे हा राष्ट्रध्वजाचा अपमान असल्याची संतप्त भावना नागरीकांमध्ये निर्माण झाली आहे. 

आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना देशातील प्रत्येक नागरीकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज प्रत्येक घरावर लावण्यात येणार आहे. घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी परिषदेने जिल्ह्यातील 473 ग्रामपंचायतींना राष्ट्रध्वजाचा पुरवठा केला आहे. ग्रामपंचायतीने ही प्रत्येक कुटुंबाला त्याचे वितरण सुरू केले आहे. प्रत्येक कुटुंबाकडुन एका राष्ट्रध्वजाचे 21 रूपये घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला दिले आहेत.

मात्र, जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीला पुरवठा केलेले राष्ट्रध्वज आयाता कृती नाहीत, अशोक चक्र ही मधोमध नाही. तसेच अनेक राष्ट्रध्वज चुकीच्या पध्दतीने कापले गेलेले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत स्थरावर चांगले राष्ट्रध्वज निवडण्याच्या कामाला कर्मचारी लागले आहेत. नागरीकांना सदोष राष्ट्रध्वज पैसे मोजून घ्यावे लागल्याने, नागरीकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. दरम्यान, काही नागरीकांनी पोष्टाकडुन राष्ट्रध्वज मागविले आहेत, ते राष्ट्रध्वज देखील सदोष असल्याची पोष्ट समाज माध्यमाद्वारे जिल्ह्यात सर्वत्र फिरत आहे. त्यामुळे हा राष्ट्रध्वजाचा अपमान असल्याची भावना व्यक्त करीत, राष्ट्रप्रेमींसह सर्वसासामान्य नागरीक संतापले आहेत. अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या राष्ट्रध्वजाचा अपमान होत असुन सदोष राष्ट्रध्वज नागरीकांना वाटप करून त्यापोटी पैसे वसुली करणे हे अधिक वेदनादायी असल्याचे मत राष्ट्रप्रेमींनी व्यक्त केले आहे.

जिल्हा परिषद कार्यालयाकडून राष्ट्रध्वज पुरविण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेक राष्ट्रध्वज सदोष आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी चांगले राष्ट्रध्वज निवडुन ते नागरीकांना वितरीत करत आहेत. एका राष्ट्रध्वजाचे 21 रूपये घेण्याचे आदेश आहेत. मात्र, आम्ही राष्ट्रध्वज मोफत वाटप केले आहेत.

- सुधामती धायतडक, ग्रामसेविका, खोडाळा ग्रामपंचायत.

गुजरातच्या सुरत मधुन सदोष राष्ट्रध्वजाचा पुरवठा का?

पालघर जिल्ह्याला पुरवठा करण्यात आलेले राष्ट्रध्वज गुजरात मधील सुरत येथे तयार करून पुरवठा करण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. त्यामुळे निर्मीती गुजरात मध्ये आणि त्याची पैसे घेऊन महाराष्ट्रात विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या राष्ट्रध्वजाचाही व्यापार केला गेला की काय अशी संतप्त प्रतिक्रिया नागरीकांमधुन उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT