Palghar News sakal
मुंबई

Palghar News: अतिवृष्टीमुळे पीकअप शेड जमीनदोस्त, जिवीतहानी टळली!

Maharashtra : ऐन पावसाळ्यात आता प्रवाशांचा आसरा हरवल्याने, त्यांचे हाल होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mokhada News: मोखाड्यातील मोखाडा  - खोडाळा  - विहीगांव या राज्यमार्गावरील जोगलवाडी येथील प्रवाशांना निवारा देणारे पीकअप शेड अतिवृष्टीमुळे कोसळले आहे. सदरची घटना गुरूवारी  13  जुन ला मध्यरात्री घडली आहे.

रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणीही प्रवासी नव्हते, त्यामुळे सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. ऐन पावसाळ्यात आता प्रवाशांचा आसरा हरवल्याने, त्यांचे हाल होणार आहे.

मोखाड्यात वेगवेगळ्या भागात गेली तीन दिवसांपासून विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.

तसेच सतत वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. गुरुवारी  13   जुन ला रात्री मुसळधार पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे जोगलवाडी येथील पीकअप शेड कोसळून जमीनदोस्त झाले आहे. 

मोखाडा  - खोडाळा  - विहीगांव या राज्यमार्गावर जोगलवाडी हा बस थांबा आहे. या थांब्यावर प्रवाशांची नियमीत वर्दळ असते. ऊन, वारा आणि पावसात, प्रवासी या पीकअप शेड चा आसरा घेऊन बस आणि प्रवासी वाहनांची वाट पाहत असतात.

सदरचे पीकअप शेड जीर्ण झालेले होते. मात्र, पीकअप शेड रात्री कोसळल्याने, सुदैवाने जिवीतहानी टळली आहे. मात्र, ऐन पावसाळ्यात शेड कोसळल्याने आता पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारामुळे कृषी आणि दुग्ध व्यवसाय धोक्यात? शरद पवारांनी चिंता; सरकारने दिलं स्पष्टीकरण...

MS Dhoni Video: विराट - रोहितने २०२७ वर्ल्ड कप खेळावा का? धोनीने थेट सांगितलं, 'वय कधीही...'

Latur News: लातूरजवळील धावपट्टी चुकली तर विमानाचे दगडाच्या खाणीत लॅंडिंग; विमानतळाभोवती बेसुमार दगडांचे उत्खनन, धक्कादायक माहीती समाेर..

कोरियन गेमच्या नादात भारतात तीन सख्या बहिणींनी दिला जीव; 10 गेम्स आरोग्यावर करतायत परिणाम, मुलांच्या सुरक्षिततेसाठी करा 'हे' उपाय

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

SCROLL FOR NEXT