मुंबई

पालघरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, होळीच्या दिवशीच एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पूजा विचारे

मुंबई: पालघरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. होळीच्या दिवशीच एकाच कुटुंबातील चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रात्री घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. पालघरमधील ब्राम्हण पाडा येथे ही घटना घडली. या आगीत वृद्ध आई, पत्नी आणि दोघा मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर या आगीत मुलगा आणि दोघं नातवंडं आगीत जखमी झाले आहेत. 

रविवारी रात्री पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ब्राम्हण पाडा या गावात ही दुर्देवी घटना घडली. अनंता मौळे यांच्या घराला ही आग लागली. समोर आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. जेव्हा ही दुर्देवी घटना घडली तेव्हा घरात एकूण सात जण होते. बघताच क्षणी आगीनं रौद्ररुप धारणं केलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या आगीत घरमालक असलेले अनंता मौळे, त्यांची चार मुलं, पत्नी आणि वृद्ध आई आगीत अडकले. या घटनेत अनंता मौळे यांची दोन मुलं, आई आणि पत्नीचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनंता मौळे आणि दोन मुलं बचावली आहेत. 

आगीच्या मोठ्या ज्वाला आणि धूर दिसू लागल्यानंतर गावकरी मदतीला धावले. रात्री आग लागल्यामुळे घरातील सर्वच सदस्य झोपेत होते. ही आग लागल्यानंतर घरातील काही सदस्यांना बाहेर पडण्यात यश आलं तर काही जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. 

गंगुबाई बाळू मौळे - आई (78)
द्वारका अनंता मौळे - पत्नी (46)
पल्लवी अनंता मौळे - मुलगी (15)
कृष्णा अनंता मौळे - मुलगा (10)

या चौघांचा या दुर्देवी घटनेत मृत्यू झाला आहे. 

भावेश अनंता मौळे - मुलगा (12)
अश्विनी अनंता मौळे - मुलगी (17)

हे दोघे या घटनेत जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर अनंता बाळू मौळे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून मोखाडा दवाखान्यात उपचार सुरु आहे.

Palghar news mokhada fire incident four member died family

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reliance Share: अंबानींच्या Reliance ला मोठा धक्का! शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 44 हजार कोटी बुडाले; नेमकं काय घडलं?

Jalna News : महापालिकेत भाजप-शिवसेनेचा राडा; महात्मा फुले मार्केट वरून जुंपली

Latest Marathi News Live Update : कल्याण ते टिटवाळा रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड

IPL 2026 : ओहहहह भाई.. मोहम्मद शमीचा 'मॅजिक' डान्स पाहिलात का? SRH वर दणदणीत विजयानंतर भन्नाट सेलिब्रेशन Video Viral

पारूमधील 'ही' गाजलेली जोडी आता गाजवणार रंगभूमी ! स्पायगिरी नाटकात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

SCROLL FOR NEXT