Palghar news  
मुंबई

Palghar : गतीमान महाराष्ट्रात विद्यार्थ्यांवर घराच्या ओट्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ; कारण...

अमोल सांबरे

विक्रमगड - विक्रमगड तालुक्यातील बालापूर पाटील पाडा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळेत 85 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र शाळेची एक इमारत कोसळली असल्याने विद्यार्थ्यांवर एका घराच्या ओट्यावर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. सरकारकडून सातत्याने विकास महाराष्ट्रा गतीमान असल्याचा दावा करण्यात येतो. मात्र त्याच महाराष्ट्रात अशी स्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त कऱण्यात येत आहे.

तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखाल्यांची दुरावस्था झाली आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांकडून नेहमीच यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला जातो. मात्र जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या सगळ्याकडे दुर्लक्ष करत असून जिल्हा परिषदेकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषद बाळापुर-पाटील पाडा येथील विद्यार्थ्यांना वर्ग खोली किंवा इतर सुविधा न दिल्यास मनसे विक्रमगड तालुका मार्फत विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन 14 ऑगस्ट पासून उपोषण करण्यात येईल असा इशारा मनसे मार्फत शिक्षण विभागाला देण्यात आला आहे.

शिक्षण विभागातीत रिक्त पदे

तालुक्यातील 236 शाळांमधील गट शिक्षणाधिकारी सहीत अधिक्षक-1, विस्तार अधिकारी वर्ग 2 श्रेणी 3 चे 3 पदे, विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी 3 ची 3 पदे, केंद्रप्रमुख-14, मुख्याध्यापक -28, पदविधर-90,सहशिक्षक-117 असे एकुण 255 पदे रिक्त आहेत.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात वर्ग खोल्या दुरुस्तीची गरज

तालुक्यातील 751 वर्गखाल्यां नादुरुस्त झाल्या आहेत. वर्ग खोल्या दुरुस्त करण्याची गरज आहे. त्यामुळे खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागते आहे. मागील अनेक वर्षांपासून ग्रामस्थ आणि स्थानिक ग्रामपंचायतीनं ठराव देऊनही शिक्षण विभाग या वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असल्यानं स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासानाने प्रस्तावित वर्गखोल्यांची दुरुस्तीचें कामे लवकरात लवकर हाती घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांची मागणी आहे.

विक्रमगड तालुक्यातील बालापुर पाटील पाडा या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. एक वर्ग एकाच्या घराच्या ओट्यावर बसतो. तातडीने या विध्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगल्या वर्गाची सोय केली नाही तर विध्यार्थ्यांच्या पालकांना सोबत घेऊन शिक्षण विभागाच्या विरोधात येत्या 14 ऑगस्ट पासून विक्रमगड मनसे उपोषण करेल.

-योगेश पाटील, (विक्रमगड तालुका अध्यक्ष,मनसे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT