Palghar Railway Accident  sakal
मुंबई

Palghar Railway Accident : अखेर २६ तासांनी विरारकडे सुटली पहिली लोकलं, रेल्वेच्या प्रयत्नांना आले यश

सकाळ वृत्तेसवा

Mumbai News: मंगळवार 28 मे सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी पालघरच्या रेल्वे वार्डात मालगाडी घसरल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अप मार्गिकेवरील रेल्वे सेवा खंडित झाली होती. सुमारे सव्वीस तासांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून 29 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता विरार कडे पहिली लोकल पालघर येथून सोडण्यात आली.(palghar local Accidnet)

28 मे. मंगळवारी सायंकाळी पालघर रेल्वे वार्डात मालगाडी घसरल्याने गुजरात कडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गीके वरील वाहतूक ठप्प झाली होती. घसरलेल्या मालवाहू डब्यांना सरकविण्याचे काम तसेच नव्याने स्लीपर अंथरून त्यावर रेल्वे रूळ उभारण्यासाठी युद्धपातळीवर दिवस-रात्र काम सुरू होते. त्याचबरोबर वाकलेला विद्युत वाहिनीचा खांब बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. विभागीय रेल्वे अधिकारी (डीआरएम) नीरज वर्मा यांच्या सह वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या देखरेखीखाली 500 पेक्षा अधिक मनुष्यबळाच्या मदतीने काम सुरू होते.(palghar railway Accident)

घसलेला एक डबा बाजूला सरकविणे व विद्युत प्रणाली पूर्ववत केल्यानंतर चाचणी घेल्यानंतर मुंबई कडे जाणारी मार्गिका खुली करण्यात आली. 29 मे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होईल असे सांगण्यात आले होते.

अखेर सुमारे सव्वीस तासांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून 29 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता विरार कडे पहिली लोकल पालघर येथून सोडण्यात आली.(Railway News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT