मुंबई

Palghar: शासनाने आनंदाच्या शिध्याला लावली कात्री, हजारो कुटुंब शिध्यापासुन राहणार वंचित!

पालघर जिल्ह्यात ही स्थिती नसुन संपुर्ण राज्यात आनंदाच्या शिध्याचे कमी संख्येने वितरण करण्यात आल्याचे सरकारी अधिकारी सांगत आहेत.

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

Latest Mokhada News: गोरगरिबांना आनंदात सणं साजरा करता यावा. सणाला त्यांना ही गोडधोड खायला मिळावे म्हणून " आनंदाचा शिधा " ही योजना महायुती सरकार ने आणली आहे.

मात्र, यंदाच्या गणेशोत्सवाला शासनाकडून राज्यातील लाभार्थी संख्ये एव्हढा आनंदाचा शिध्याचा पुरवठा न करता त्याला कात्री लावुन अपूर्ण किटचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानांना केला आहे. त्यामुळे हजारो आदिवासी, गोरगरीब कुटूंब आनंदाच्या शिध्या पासुन वंचित राहणार आहेत. एकट्या मोखाडा तालुक्यात सुमारे एक हजार  935  आदिवासी कुटूंबाना या शिध्यापासुन वंचित रहावे लागणार आहे. यंदा त्यांचा गणेशोत्सव कडु होणार आहे. 

       गोरगरिबांना सणांला गोड खाता यावे, म्हणून महायुती सरकार ने आनंदाचा शिधा ही योजना गतसालापासुन राज्यात अंमलात आणली आहे. गरीब कुटुंबाना केवळ  100  रूपयांत प्रत्येकी एक किलोचे रवा, साखर, पामतेल आणि चणाडाळीचे किट, स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब शिधा पत्रिका धारकांना देत आहे. त्यामुळे ही योजना खुपच लोकप्रिय झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवाला या किट ची अपेक्षा गोरगरिबांना लागली आहे. 

                मात्र, महायुती ने सरकार ने यंदाच्या गणेशोत्सवाला लाभार्थी कुटुंबांच्या संख्या एव्हढा आनंदाचा शिध्याचा पुरवठा न केल्याने, हजारो कुटुंब या शिध्यापासुन वंचित राहणार आहे. यंदा त्यांचा गणेशोत्सव कडु होणार आहे.

मोखाडा तालुक्यात  64  स्वस्त धान्य दुकाने आहेत. तालुक्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब अशी एकुण  19  हजार  83  लाभार्थी कुटुंब संख्या आहे. यामध्ये अंत्योदय चे  48  हजार  745  तर प्राधान्य कुटुंब शिधा पत्रिका धारक   42  हजार  887  असे एकूण  91  हजार  632  लाभार्थी संख्या आहेत.

             तर ऑनलाईन नोंदणी प्रमाणे मोखाड्यात 18  हजार  690  कुटुंब " आनंदाचा शिधा " योजनेसाठी पात्र लाभार्थी शिधा पत्रिका धारक कुटुंब आहेत. मात्र, शासनाकडून तालुक्याला  16  हजार  755  आनंदाचा शिध्याचे किट ऊपलब्ध झाले आहेत.

त्यामुळे सुमारे  1  हजार  935  लाभार्थी कुटुंब आनंदाच्या शिध्यापासुन वंचित राहणार आहे. एकट्या मोखाडा तालुका अथवा पालघर जिल्ह्यात ही स्थिती नसुन संपुर्ण राज्यात आनंदाच्या शिध्याचे कमी संख्येने वितरण करण्यात आल्याचे सरकारी अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो गरीब कुटुंबांचा गणेशोत्सव कडु होणार आहे. 

दुकानदार आणि लाभार्थ्यीमध्ये खटके.....

तालुक्यातील  64  स्वस्त धान्य दुकानात  20  ते  50  च्या दरम्यान कमी संख्येने आनंदाचा शिध्याचे किट वाटप करण्यात आले आहे. सदरचा शिधा सर्वच लाभार्थी घेतात. त्यामुळे जे लाभार्थी लवकर येऊन शिध्याचे किट घेतील त्यांचा गणेशोत्सव गोड होणार आहे. शिध्याचे किट कमी मिळाल्याने प्रत्येक दुकानातील लाभार्थी या शिध्यापासुन वंचित राहणार आहेत. त्यामुळे वाटप सुरू असलेल्या दुकानात लाभार्थी आणि दुकानदारांमध्ये शाब्दिक भांडण तसेच खटके ऊडु लागले आहेत. आम्हाला गोरगरिब कुटूंबाच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे, स्वस्त धान्य दुकानदारांनी सांगितले आहे. 

ऑनलाईन लाभार्थी संख्येनुसार आनंदाच्या शिध्याची मागणी केली होती. मात्र, शासनाकडून  1  हजार  935  आनंदाच्या शिध्याच्या किटचा पुरवठा कमी झाला आहे. ही स्थिती मोखाडा तालुका अथवा पालघर जिल्ह्यात नसून संपुर्ण राज्यात आहे. ऊर्वरित किट मिळावे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे पुन्हा मागणी केली आहे. 

ऊपेंद्र देशमुख, पुरवठा अधिकारी, मोखाडा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT