Aishwarya Rai Bachchan  
मुंबई

ऐश्वर्या राय बच्चन ED कार्यालयात, कागदपत्रांची तपासणी सुरू

वाचा नेमकं काय आहे प्रकरण?

स्वाती वेमूल

जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स लीकप्रकरणी ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला (Aishwarya Rai Bachchan) समन्स बजावले आहे. त्यानंतर ऐश्वर्या ईडीच्या कार्यालयात पोहोचली आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचं नाव समोर आलं होतं. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. (Panama Papers Leak Case)

बच्चन कुटुंबीयांचं नाव का?

२०१६ मध्ये पनामातील मोझॅक फॉन्सेका या कायदा कंपनीची कागदपत्रं लीक झाली होती. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींची नावं समोर आली होती. भारतातील जवळपास ५०० जणांची नावं समोर आली होती. त्यात बच्चन कुटुंबाचाही समावेश आहे. कंपनीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन हे १९९३ ते १९९७ या कालावधीत चार परदेशी कंपन्यांचे संचालक होते. या कंपन्यांचं भांडवल ५ ते ५० हजार डॉलर्स इतकं दाखविण्यात आलं होतं. मात्र, हे वृत्त प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अमिताभ यांनी आरोप फेटाळले. 'माझा अशा कोणत्याही कंपन्यांशी संबंध नसून मी या कंपन्यांचा संचालक नाही. मी परदेशात खर्च केलेल्या पैशांवरील सर्व कर भरलेला आहे. याशिवाय मी परदेशात पाठविलेले पैसे भारतीय कायद्याला धरून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

चार कंपन्यांपैकी तीन बहामासमध्ये, तर एक व्हर्जिन आयलँडमध्ये होती. ऐश्वर्याला एका कंपनीची संचालिका बनवण्यात आलं होतं. नंतर तिला कंपनीची शेअर होल्डर म्हणून घोषित करण्यात आलं. कंपनीचं नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होतं. त्याचं मुख्यालय व्हर्जिन आयलँडवर होतं. ऐश्वर्याशिवाय तिचे वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील कंपनीत भागीदार होते. २००५ मध्ये स्थापित झालेली ही कंपनी २००८ मध्ये बंद झाली.

पनामा देशातील मोझॅक फॉन्सेका नावाच्या कायदेशीर सेवा पुरवणाऱ्या कंपनीची ११.५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रं उघड करण्यात आली होती. त्यातून राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, कलावंत, क्रीडापटू अशा अनेक बड्या व्यक्तींनी आपली मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा, व्हर्जिन आयलँड, जर्सी, बहामा अशा प्रदेशांमध्ये स्थापन केलेल्या कंपन्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर पैसा कशा पद्धतीने फिरवला गेला याबाबत थक्क करणाऱ्या बाबी स्पष्ट झाल्या होत्या. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, डीएलएफचे मालक के. पी. सिंग, इंडियाबुल्सचे मालक समीर गेहलोत, गुंड इकबाल मिर्ची यांच्यासह ५०० भारतीयांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT