pankaja munde-devendra fadnavis google
मुंबई

'मी आजही मुख्यमंत्री', फडणवीसांच्या विधानावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

"तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही, की मुख्यमंत्री नाही"

दीनानाथ परब

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) आज नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये (belapur) एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी तिथे बोलताना फडणवीसांनी 'मला एकही दिवस जाणवलं नाही, की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही असं वाटतं की मी मुख्यमंत्रीच आहे', असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. फडणवीस यांच्याच पक्षातील त्यांच्या सहकारी पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "लोकांचं प्रेम मिळत असेल, एखाद्याला असं वाटत असेल तर ती चांगली गोष्ट आहे" असं पंकजा म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस त्या कार्यक्रमात काय म्हणाले...

"तुमच्यासारखे नेते पाठीशी असल्यामुळे मला एकही दिवस जाणवलं नाही, की मुख्यमंत्री नाही. मला आजही असं वाटतं की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचं नाही. तो काय करतो हे महत्वाचं आहे. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिलं नाही. मला आशीर्वाद मिळेल त्यावेळी मी याचठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे" असे फडणवीस म्हणाले.

पंकजा मुंडे ओबीसी कार्यक्रमात काय म्हणाल्या...

पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. "ओबीसीला धोका देण्याचा षडयंत्र रचत असाल, तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरु देणार नाही. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य झाली पाहिजे" असं पंकजा यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

Tukaram Munde news: मुंढेंचा दणका, अकोल्यात गुटख्याचा कारखाना उद्धवस्त..50 लाखांचा माल जप्त..

SCROLL FOR NEXT