A married women suicide  sakal media
मुंबई

पनवेल : छळाला कंटाळून दोन विवाहितांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : खारघर आणि पनवेलच्या नेरे या भागांत दोन विवाहितांनी (Married woman) छळाला कंटाळून आत्महत्या (suicide incident) केल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये संबंधितांना अटक केली आहे; तर सहभागी इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
खारघरमध्ये मनिषा वाळेकर (Manisha walekar) हिने २ नोव्हेंबर रोजी पती गोपीचंद याच्याकडून मारहाण झाल्यानंतर टाटा रुग्णालयाजवळ (Tata hospital) एका झुडपात गळफास घेऊन आत्महत्या केली.

तीन दिवसांनंतर मनीषाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. गोपीचंद याचे अन्य महिलेशी अनैतिक संबंध असल्याने तो मनीषाला मारहाण करीत होता. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार मनीषाच्या वडिलांनी केली. नेरे येथील नेहा नरेश पाटील (२४) हिने ४ नोव्हेंबर रोजी दुपारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

नेहाचा पती नरेश रामदास पाटील आणि नेहाची चुलतसासू हिराबाई रामदास पाटील (४५) पैशांसाठी मानसिक छळ करत होते. नरेश याच्या आजीच्या नावाने सुकापूर येथे असलेल्या जमिनीच्या मालकी हक्कावरून तसेच हिश्श्यावरून नरेश पाटील हा नेहाला वारंवार मानसिक त्रास देत होता, असे नेहाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT