मुंबई

पनवेल: रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद, वेळेबाबत मात्र नाराजी

दिपक घरत

मुंबई: सोमवारपासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची मुभा सरकारकडून देण्यात आली. तरी हार्बर मार्गावरील पनवेल ते CSMT स्थानकापर्यंत लोकलच्या वेळापत्रक बाबतीत मात्र रेल्वे प्रवाशांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळाले. सकाळी 7 आणि दुपारी 12 च्या लोकलच्या वेळेमुळे मुंबई परिसरात कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाला मात्र या रेल्वे प्रवसाचा कोणताच फायदा होणार नसल्याचे मत अरविंद धुमाळ यांनी व्यक्त केलं आहे. धुमाळ हे खांदेश्वर येथून मुंबईला परिसरात कामानिमित्त प्रवास करतात.

लोकल प्रवासादरम्यान होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगात होण्याची शक्यता लक्षात घेत लॉकडाऊन काळात लोकल प्रवास बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होताच मिशन बिगिन अगेन अंतर्गत सुरुवातीला वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसोबत सरकारी खात्यात काम करणाऱ्या कामगारवर्गकरिता लोकल प्रवासाचे दरवाजे खुले करण्यात आले.

तर ऑक्टोबर 2020 पासून महिला प्रवाशांना देखील लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आल्याने सर्वच सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांकरिता लोकल प्रवास पुन्हा सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 1 फेब्रुवारीपासून अखेर सर्वसामान्य प्रवाशांकरिता लोकल प्रवास पुन्हा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर करत सोमवारी सकाळी 7 पासून हार्बर मार्गावरील पनवेल ते सी एस एम टी पर्यंतची सर्वसामान्य प्रवाशांकरीता पहिली लोकल धावली आहे.
 
वेळेबाबत नाराजी

पनवेल येथून CSMT कडे जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकातून पहाटे 7 ला पहिली लोकल सोडण्यात येणार आहे. 12 वाजता दुसरी लोकल सोडण्यात येणार असल्याने सकाळी 9 ते 10 या वेळेत मुंबई परिसरातील कार्यालयांमध्ये कामावर जाणाऱ्या लोकल प्रवाशांना सकाळची पहिली लोकल पकडून कार्यालयीन वेळेपेक्षा काही तास अगोदर अथवा 12 ची लोकल पकडून काही तास उशिरा कार्यालय गाठावे लागणार असल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांना या लोकल प्रवासाचा कोणताच फायदा होणार नसल्याचे मत संजय पाटील या प्रवाशाने व्यक्त केले.

पनवेल, खांदेश्वर, कामोठे परिसरातून मुबंई परिसरात कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असून, रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी येथील प्रवाशी मोठ्या प्रमाणात शेयर रिक्षेवर अवलंबून आहेत. लोकल प्रवास पुन्हा सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेले रिक्षा चालक मात्र सर्वसामान्य प्रवाशांकरिता लोकल सुरु झाल्याने आनंदीत आहेत.

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

panvel to csmt mumbai local train services open for all after 10 months

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT