मुंबई

Breaking: पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची तडकाफडकी बदली; आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनंतर उपायुक्तांचीही बदली

दीपक घरात

पनवेल : लोकाभिमुख, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तर देऊन समाधान करणारे अशी ख्याती असलेले पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची सोलापूर महापालिकेच्या उपायुक्त पदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. लेंगरेकर यांच्या बदली मुळे पनवेल कर आणखी एका कार्यतत्पर अधिकाऱ्याला मुकले असल्याची भावना पनवेल करांकडून व्यक्त केली जात आहे.

गणेश देशमुख यांची बदली करून पनवेल पालिकेच्या आयुक्त पदावर सुधाकर देशमुख यांची काही महिन्या पूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रशांत रसाळ यांची देखील काही दिवसापूर्वी बदली करण्यात आल्याने नव्याने नियुक्ती करून आलेल्या अधिकाऱ्यांसोबत कोरोना संसर्गाच्या काळात पालिकेच्या सुरवातीपासून पनवेल पालिकेत कार्यरत असलेल्या अनुभवी अधिकाऱ्याची गरज आहे. आशा वेळी लेंगरेकर यांची बदली करून प्रशासन पनवेल करांवर अन्याय करत असल्याचे मत शिवसेना महिला आघाडीच्या कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.पनवेल पालिका हद्दीतील कोरोना संसर्गाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.सद्य स्थितीत पालिका हद्दीत 8 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले असून,193 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असताना वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी अधिका-यास बदलणे कितपत योग्य आहे? असा सवाल पनवेल करांकडून उपस्थित केला जात आहे.

पनवेल पालिकेच्या स्थापने नंतर घेण्यात आलेल्या पहिल्या निवडणुकी पासून जमीर लेंगरेकर हे पनवेल पालिकेत कार्यरत असून,पालिका हद्दीतील सर्व विषयांची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये लेंगरेकर गणले जात असल्याने नव्याने नेमणूक करून आलेल्या आयुक्त,अतिरिक्त आयुक्तांसोबत अनुभवी अधिकाऱ्यांची गरज असल्याचे मत एकता सामाजिक सांस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व्यक्त केले आहे.

पालिका आयुक्त,अतिरिक्त आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्याने नव्याने नियुक्ती होऊन आलेल्या अधिकाऱ्यांसोबत लेंगरेकर यांच्या सारख्या अनुभवी अधिकाऱ्याची पनवेल कराना गरज आहे.
- रंजना सडोलीकर,
सचिव.कफ सामाजिक संस्था. कामोठे.

------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT