Murder crime sakal media
मुंबई

पनवेल : डोक्यावर विटाने हल्ला करून पत्नीची हत्या; वीटभट्टी कामगाराला अटक

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : चारित्र्याच्या संशयावरून वीटभट्टी कामगाराने (Brick kiln worker) पत्नीच्या (wife murder) डोक्यामध्ये विटाने हल्ला करून तिची हत्या केली. यानंतर पलायन केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी हत्येचा गुन्हा (Murder case) दाखल करून आरोपी (culprit arrested) पतीला अटक केली. पनवेल तालुक्यातील चिंचवली येथील दशरथ भगत यांच्या वीटभट्टीवर दीपक उर्फ पिंटू विठ्ठल दिवा (वय ३६) हा मोलमजुरी करून कुटुंबासह त्याच ठिकाणी झोपडीत राहात होता. दीपक आपल्या पत्नीवर संशय घेत असल्याने त्यांच्यामध्ये नेहमी भांडण होत होती.

त्यांचे भांडण सोडविण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीवर देखील तो संशय घेत होता. पत्नीचे तिच्या नातेवाईकांशी अनैतिक संबंध असल्याचा दीपकला संशय होता. यावरूनच गुरुवारी (ता. १७) रात्री पती-पत्नीमध्ये भांडण झाले. शेजारी राहणाऱ्या कुटुंबाने त्यांच्यातील भांडण सोडवून ते आपल्या घरी निघून गेले.

मात्र त्यानंतर भांडण विकोपाला गेल्यानंतर दीपकने पत्नीला विटाने मारहाण करून तिची हत्या केली. त्यामुळे त्यांच्या मुलीने रडत रडत शेजाऱ्यांकडे जाऊन सदरचा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी जाऊन पहाणी केली असता, ती मृतावस्थेत आढळून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT