मुंबई

पनवेलकरांची अँन्टीजन चाचणीसाठी वणवण; रुग्णांची नाईलाजाने खासगी रुग्णालयाकडे धाव

गजानन चव्हाण


खारघर :  पनवेल पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात दोन दिवसापासून अँटीजेन टेस्ट किटचा तुटवडा जाणवत असल्यामुळे रुग्णास नाईलाजाने खाजगी रुग्णलयात कोरोनाची टेस्ट करावी लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

पनवेल पालिका हद्दीत कोरोनाचे लक्षणे  असलेल्या व्यक्तीला  कोरोनाच्या तपासणीसाठी पालिकेच्या उपजिल्हा रुग्णालयात जावे लागत असे, त्यामुळे रुग्ण आणि त्यांचा नातेवाईकांना नाहक त्रास होत असे,पालिका हद्दीत कोरोना रुग्णाच्या वाढती संख्या पाहून पालिका प्रशासनाने जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पालिकेच्या जुने पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, खारघर आणि कामोठे येथील नागरी आरोग्य केंद्रात अँटेजीन टेस्ट चाचणी सुरु केल्यामुळे  कोरोनाचे  लक्षणे असलेल्या व्यक्तीची अँटेजीन टेस्टची तपासणी करून तीस मिनिटात अहवाल उपलब्ध होत असे, त्यामुळे पुढील उपचार करण्यास सोयीचे होत असे. मात्र गेल्या दोन दिवसापासुन पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात अँटेजीन टेस्ट किटचा  तुटवडा जाणवत असल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने खाजगी रुग्णालय गाठावे लागत आहे.

पालिका हद्दीत रोज सव्वाशेहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना अँटेजीन टेस्टसाठी लागणारे  किट उपलब्ध नसल्यामुळे आणि केव्हा उपलब्ध होईल या विषयी परिपूर्ण माहिती दिली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

सर्दी तापाचे लक्षणे असलेल्या दोन व्यक्तीला पालिकेच्या पनवेल येथील नागरी आरोग्य केंद्रात अँटेजीन टेस्टच्या तपासणीसाठी पाठविले असता. किट उपलब्ध नसल्यामुळे तपासणी विना माघारी यावे लागले. तसेच केव्हा किट उपलब्ध होईल या विषयी माहिती दिली जात नाही.

डॉ मुनीम तांबोळी,
अध्यक्ष - राष्ट्रीय दक्ष नागरिक संस्था. 

अँटेजीन टेस्टच्या किट आज उपलब्ध नव्हते.मात्र उद्या पंधरा हजार किट उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या आरोग्य केंद्रात  आर.टी.-पी.सी.आर. टेस्ट सुरु आहे.

- सुधाकर देशमुख,
पालिका आयुक्त पनवेल महागरपालिक 

मी सध्या होम कोरोनटाईन आहे. सुरुवातीला अँटेजीन टेस्टच्या किट शासनाकडून उपलब्ध झाल्या होत्या. किटचा तुटवडा असेल त्वरित मागवून घेतले जाईल. - डॉ कविता चौतमल,
महापौर  पनवेल महानगरपालिका 

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT