मुंबई

कागज नही दिखाएंगे' सत्याग्रहाचा युवकांचा निर्धार 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : भारतीय संविधानाने राणीच्या पोटातून जन्म घेणाऱ्या राजाची राजेशाही आणि संस्थानिकांची मनमानी संपवून देशातील जनतेला समान हक्क देत विषमतेतून मुक्तीची वाट दाखवली आहे. त्यामुळे संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांच्या रक्षणासाठी युवा रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालयाने न्याय दिला तर ठीकच; नाही तर महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार, नागरिकता दुरुस्ती कायदा हा धर्माधारित भेदभाव करणारा आणि संविधानाच्या आत्म्याशी फारकत घेणारा असल्याने, त्याविरुद्ध "कागज नहीं दिखाएंगे" हा सत्याग्रहही युवक करतील, असा खणखणीत इशारा ठाण्यातील युवा टॉक शो मध्ये युवकांनी दिला. 


गेला महिनाभर ठाण्यातील विविध लोकवस्त्यांत झालेल्या क्रांतिजोती सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेच्या समारोपाच्या पंधराव्या पुष्पात, "महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त संविधान, नागरिकता आणि युवकांचे हक्क' या विषयावर समता विचार प्रसारक संस्था आणि म्यूज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ठाण्यातील विविध महाविद्यालयातील आणि संघटनातील युवकांनी गर्दी केली होती. या टॉक शोच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ होते. कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया, प्रा. वृषाली विनायक, उत्तम जोगदंड, उन्मेष बागवे आदी उपस्थित होते. 

ही बातमी वाचा ः कोरेगाव-भिमा आयोगाला वेतन नाही
नागरिकतेसंदर्भांत झालेल्या चर्चेत हे युवा म्हणाले की, देशात जो राहतो तो या देशाचा नागरिक. त्याच्याकडून नाहक पुरावे मागणे हे गोरगरीब, प्रकल्पग्रस्त, आदिवासी, आदींसाठी जिकिरीचे ठरू शकते. विकासाचा दर सुस्थितीत राखणे हे सरकारला जमत नसल्यामुळे नागरिकता कायदा दुरुस्ती आणि त्यापाठोपाठ येऊ घातलेले नागरिक नोंदणी आणि जनसंख्या नोंदणी हेही अनावश्‍यक असल्याचे मत आसामच्या विशिष्ट परिस्थितीचा दाखल देत युवकांनी मांडले. प्रथमेश्वर उंबरे, कपिल खंडागळे, जुही शहा, रिंकल भोईर, यश माडगावकर, सोनू गुप्ता, सर्वेश अकोलकर आणि नीरज आठवले या विद्यार्थी- युवकांनी टॉक शो मध्ये आपली मते मांडली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या कोणी? ; प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना सवाल

आजचे राशिभविष्य - 12 मे 2024

Mothers Day 2024 : मदर्स डेची सुरूवात जिने केली तिलाच तो बंदही करायचा होता? कारण...

Hail Warning : पुणे जिल्ह्यात आज गारपिटीचा इशारा ; कमाल तापमानाचा पारा ३७.८ अंशांपर्यंत खाली

Jat-Sangola Road Accident : कामासाठी जाणाऱ्या महिलांच्या जीपला भीषण अपघात; 3 महिला ठार, तर 10 जण जखमी

SCROLL FOR NEXT