Dr. Shrikant Shinde  esakal
मुंबई

Kalyan Lok Sabha: श्रीकांत शिंदेंचा मुस्लिम मतांवर डोळा, पप्पू कलानी करणार मदत

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना उल्हासनगरातील मुस्लिमांचा पाठींबा मिळवून देण्यासाठी माजी आमदार पप्पू कलानी व टीओके प्रमुख ओमी कलानी धावले आहेत

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : कल्याण लोकसभेसाठी वंचितने मुस्लिम उमेदवार दिला आहे.अशा वेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना उल्हासनगरातील मुस्लिमांचा पाठींबा मिळवून देण्यासाठी माजी आमदार पप्पू कलानी व टीओके प्रमुख ओमी कलानी धावले आहेत. विशेष म्हणजे ज्या मुस्लिम नेत्यांनी डॉ.शिंदे यांना पाठींबा दिला आहे त्यात सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरणारे आणि पक्षाने दुसरा उमेदवार जाहीर करताच माघार घेणारे जमिल खान उर्फ डॉन यांचाही समावेश आहे.

ओमी कलानी यांनी डॉ.श्रीकांत शिंदे यांना समर्थन दिले असून 'दोस्ती का गठबंधन' जाहीर केले आहे. शिंदेंच्या प्रचाराचा एक भाग म्हणून टीम ओमी कलानीच्या अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहणारे डॉ.श्रीकांत शिंदे यांना मुस्लिमांचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी पप्पू कलानी,ओमी कालानी यांनी पुढाकार घेतल्याची माहिती कालानी कुटुंबियांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक मनोज लासी यांनी दिली.

या बैठकीत शिंदे म्हणाले, सध्या अनेक जण धर्माच्या नावावर लोकांची दिशाभूल करून मते मागत आहेत.पण आपण आज येथे एकत्र असून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मात्र सर्वांना सोबत घेऊन चालायचे. त्यामुळेच तेव्हा साबीरभाई शेख आणि आत्ता अब्दुल सत्तार मंत्री असल्याचे सांगितले.

आज धार्मिक तणाव निर्माण करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आम्ही विकास करताना कधी धर्म पाहिला नसून सगळ्या भागात विकासकामे केली आहेत.हॉस्पिटल,शाळा याचा फायदा सगळ्या धर्माच्या लोकांना होणार आहे.शहरातील अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण आणि पुनर्विकास यासाठी सरकारने विशेष धोरण आणले.आज कल्याण लोकसभेत 'वोट फॉर डेव्हलपमेंट' म्हणत आम्ही निवडणूक लढवत आहोत.
डॉ. श्रीकांत शिंदे

महायुती सरकारने प्रत्येक मदरशाला पुनर्विकासासाठी निधी दिला आहे. शहरात एक चांगली उर्दू शाळा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ.शिंदे यांनी सांगितले.

याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार पप्पू कलानी,माजी आमदार राजेश क्षीरसागर,भाजपा निरीक्षक श्रीकांत पाटील, शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे, उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, टीओके प्रवक्ते कमलेश निकम, टीओके अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मोनू सिद्दीकी, कार्याध्यक्ष मझहार मिर्झा, माजी नगरसेवक मनोज लासी,सदर हाजी रिझवान खान आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमध्ये आगीचं रौद्ररूप, परिसरात धुराचे मोठे लोट; गॅरेजला अचानक लागलेल्या आगीचा VIDEO VIRAL

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

हर्षवर्धन राणे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये? पुण्याजवळील पानशेतमध्ये दोघांची गुपचूप ट्रिप? एका पोस्टने वाढली चर्चा

Horrible Video: सेलिब्रेशन पडले महागात, ब्राझिलचा फुटबॉलपटू थेट पडला 'खोल' खड्ड्यात; Live सामन्यातील घटनेनंतर सर्वांची पळापळ

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT