Parambir-Singh-Anill-Deshmukh sakal media
मुंबई

फरार गुन्हेगार घोषीत केलेल्या आदेशाविरोधात परमबीर सिंहांचा न्यायालयात अर्ज

सुनिता महामुनकर

मुंबई : तब्बल सहा महिन्यांनंतर मुंबई मध्ये परत आलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी आता त्यांना फरार गुन्हेगार (Fugitive criminal order) घोषीत करण्याच्या आदेशाविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज (Application in court) दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी (mumbai police) यावर भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

मुख्य महानगर दंडाधिकारी एस बी भाजीपाले यांनी मागील आठवड्यात सिंह यांना गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या एका प्रकरणात फरार गुन्हेगार घोषीत केले आहे. आज सिंह यांनी हा आदेश रद्दबातल करण्याच्या आणि न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्याच्या मागणीसाठी वकील अनुकूल यांच्यामार्फत अर्ज केला. सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना संरक्षण दिले आहे. या पार्श्वभूमीवर फरार गुन्हेगार म्हणून घोषीत करण्याला स्थगिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गुरुवारी त्यांनी खंडणीच्या प्रकरणात गुन्हे शाखेत हजेरी लावली. मुंबई पोलिसांनी सिंह यांच्या अर्जावर बाजू मांडावी असे निर्देश न्यायालयाने दिले.

सिंह यांच्या विरोधात एकूण सहा गुन्हे दाखल

बांधकाम व्यावसायिक आणि हॉटेल चालक बिमल अगरवाल यांनी गोरेगावमध्ये केलेल्या फौजदारी तक्रारीवर मुंबई पोलीस तपास करीत आहेत. सिंह, बडतर्फ पोलीस निरीक्षक सचीन वाझे यांनी माझ्याकडून सुमारे 11.92 लाख रुपयांचे खंडणी उकळली आहे. तसेच अडीच लाख रुपयांचे दोन महागडे फोन माझ्याकडून जबरदस्तीने घेतले असा आरोप केला आहे. यामध्ये आरोपी रियाज भट्टी आणि विनय सिंह यांचाही उल्लेख केला आहे. मुंबई पोलिसांनी सिंह, भट्टी आणि विनय यांच्या विरोधात फरार गुन्हेगार म्हणून कारवाई सुरू केली आहे. न्यायालयाने तिघांनाही फरार घोषीत केले आहे. यावर पुढील सुनावणी ता 29 रोजी होणार आहे.

चांदीवाल आयोगाने देखील सिंह यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जर हजर झाले नाही तर वॉरंट बजाऊ असा इशाराही गुरुवारी दिला. माजी गृहमंत्री अनील देशमुख यांच्यावर सिंह यांनी खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. यावर राज्य सरकारने निवृत्त न्या के यू चांदीवाल चौकशी आयोग नेमला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT