Parambir Singh Sakal
मुंबई

परमबीर सिंग यांना पाच हजार रुपयांचा दंड

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना न्यायमुर्ती चांदीवाल आयोगाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना न्यायमुर्ती चांदीवाल आयोगाने पाच हजार रुपयांचा दंड (Fine) ठोठावला आहे. आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्यांना 5 हजार रुपये मुख्यमंत्री कोव्हिड सहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Parambir Singh Fined Rupees 5000)

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारकडून न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आयोगाला दिवाणी न्यायालयीन अधिकार देण्यात आले आहेत. याबाबत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जबाब नोंदवला आहे. आयोगाने समन्स बजावून सचिन वाझेला हजर राहण्याचे आदेश दिले होते.

चांदिवाल समितीस चौकशी आयोग अधिनियम 1952 मधील कलम 4,5 अ, 8,9 नुसार दिवाणी आणि अनुषंगिक अधिकार प्राप्त झाले आहेत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास ही समिती याप्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर संस्थांकडे सोपवण्याची शिफारस करु शकते. सहा महिन्यांमध्ये चांदिवाल समितीकडून चौकशीला अहवाल सादर करण्यात करण्यात येणार आहे.

मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चांदीवाल यांनी 30 मे रोजी पाच जणांना समन्स बजावून या आरोपांच्या अनुषंगाने 11 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.

सचिन वाझेची माहिती पोर्टलवर मिळण्याची शक्यता

मुंबई पोलीस दलात वादग्रस्त ठरलेल्या सचिन वाजेच्या नियुक्ती चा तपशील सरकारी पोर्टलवर टाकण्यात येणार आहे अशी भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनील गलगली यांनी वाझे निलंबन आणि संबंधित बैठकिंची माहिती अर्जाद्वारे मागितली होती. या अपील अर्जावर पोलीस मुख्यालयात सुनावणी झाली. ही माहिती पोर्टलवर टाकण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे, असे कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT