Sachin waze and Parambir singh sakal media
मुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझेसह सहा जणांवर गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकाने गोरेगाव पोलीस ठाण्यात केला गुन्हा दाखल

अनिष पाटील

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh), सचिन वाझेसह (sachin waze) सहा जणांवर खंडणीचा गुन्हा (extortion case fir) दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे परमबीर सिंग व सचिन वाझे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon police station) हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. सिंग यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे. गोरेगावमधील बिमल अग्रवाल (bimal agarwal) या बिल्डराने 9 लाख रूपयांच्या खंडणीचा आरोप करत हा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच सचिन वाझेंला आत्तापर्यंत एकूण 11 लाख 92 हजारांचा हप्ता दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. परमबीर सिंह यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2020 ते मार्च 2021 पर्यंत 9 लाख वसुलीचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

बिमल अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, त्यांचे बोहो बार अँड रेस्टरांतमधून वाझे वसुली करत होते. तर आत्तापर्यंत त्यांनी वाझेंना 11 लाख 92 हजारांचा हप्ता दिला आहे. त्यांचे 1 नंबर बॉस नावाने बार सुरळीत चालू ठेवण्यासाठी वाझेंनी हप्ता गोळा केला. बिल्डर अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांच्या भागिदारी गोरगावमध्ये बोहो रेस्टॉरेंट अँड बार आणि अंधेरीच्या ओशिवारामध्ये बीसीबी रेस्टॉरन्ट अँड बार आहे. हा बार चालवण्यासाठी परमबीर सिंह, सचिन वाझे आणि तीन आरोपींनी 9 लाख रुपये आणि सॅमसंग कंपनीचा फोल्ड 2 मोबाईल हप्ता म्हणून घेतला. पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 384, 385, आणि 34 कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.बिल्डर बिमल अग्रवाल हे पोलिसांसाठी लागणाऱ्या प्लास्टिक काठ्या, बॉम्ब शोध पथकासाठी लागणारे सूट, पोलीस दलासाठी लागणारं रोबोट बनवत होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचा आरोप केल्याप्रकरणी परमबीर सिंह चर्चेत आले. राज्य सरकारने कारवाईसाठी प्रयत्न करताच परमबीर सिंह यांनी मुंबई सोडून चंडीगडमध्ये आश्रय घेतला. यात वैद्यकीय कारण देत सिंह गेली चार महिने सुट्टीवर आहेत. याप्रकरणी आत्तापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक केली आहे. त्यानंतर अनिल देशमुखांना चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आला आहे. वाजेला दिवसाला 2 कोटीचं टार्गेट दिलेलं', परमबीर यांच्याबद्दल नवीन धक्कादायक गौप्यस्फोट गोरेगावमध्ये दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्हातील तक्रारदार बिमल अग्रवाल यांनी पोलिसांना जबाब दिला आहे.

त्यात अग्रवालने पोलिसांना दिलेल्या जबानीत धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. आपला एक नंबर बॉस परमबीर सिंग आहेत, असं सचिन वाझेने सांगितल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे. तक्रारदाराच्या जबाबात राजकीय नेता व आमदाराच्याही नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. "पोलीस सेवेत दाखल होण्यापूर्वीच सचिन वाजेने व्यापारी व बुकींसोबत मिटिंग केली होती. पोलिस दलात नियुक्त होण्यापूर्वीच वसुलीसाठी वाजेची व्यापारी, बार मालक आणि बुकींसोबत बोलणी सुरु होती" असे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले.

"परमबीर सिंग यांना रोजचं 2 कोटीचं कलेक्शन हवं होतं, कोरोनामुळे वसुलीला फटका बसल्याने वाझेला हे टार्गेट दिले होते. वसुलीतील 75 टक्के पैसे 1 नंबरला तर 25 टक्के पैसे वाटून घेण्याचं प्लान ठरला होता" असा तक्रारदाराचा दावा आहे. कोरोना काळातील झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी पालिकेतील कंत्राटदारांनाही वाजेने लक्ष्य केलं होतं, असं तक्रारदाराने पोलिसांना सांगितलं. परमबीर सिंग आयुक्त झाल्यानंतर वाजेने हॉटेल-बार चालकांना तसेचं बुकींना दरवाजा उघडा ठेवून व्यवसाय करायची हमी दिली होती, असं तक्रारदाराने आपल्या जबाबात म्हटलं आहे. परमबीर सिंग, सचिन वाजे आणि त्यांचे इतर सहकारी तक्रारदाराचा ही मनसुख हिरेन करतील अशी भिती तक्रारदाराला आहे. त्यामुळेच घरातल्यांसाठी त्यांनी संरक्षण मागितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT