school fees sakal media
मुंबई

शुल्क सुधारणा अहवालात पालकांच्या पदरी निराशा ?

संजीव भागवत

मुंबई : खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांकडून (School) आकारण्यात येत असलेल्या मनमानी शुल्काला (illegal fees collection) आळा घालण्यासाठी वर्षभरापूर्वी शिक्षण सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली शुल्क सुधारणा समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या सुमारे ४० पानी अहवालात पालकांच्या पदरी केवळ निराशा पडणार असल्याचे मंत्रालयातील (Mantralaya) वरिष्ठ अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले. शुल्क सुधारणा समितीकडे पालकांच्या तब्बल २ हजारांहून अधिक सूचना (Patents instruction) आल्या होत्या; परंतु त्यातील पालक हितांच्या सूचनांकडे अहवालात फारसे गांभीर्याने पाहण्यात आले नाही, असे अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

यापुढे २० पालक एकत्र आल्यास शाळांविरोधात तक्रार करण्याची मुभा पालकांना मिळणार आहे. दुसरीकडे शाळा व्यवस्थापन आणि शाळा व्यवस्थापन समित्यांमध्ये पालकांची संख्या वाढविण्याची शिफारस या अहवालात करण्यात आल्याचे अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आहे. खाजगी शाळांतील शुल्कासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) फ्रेमवर्कनुसार शुल्क फेरनिश्चितीचे धोरण ठरविणे आवश्यक असतानाही या आयोगाचाही शुल्क सुधारणा समितीने फारसा विचार केलेला नाही.

शिवाय शुल्क अधिनियमातील कलम ६ नुसार शुल्क निश्चितीसाठी सरकारने डिजिटल ऑलनाईन सिस्टीम विकसित करणे आवश्यक असून त्याचाही विचार समितीने केला नाही. दरम्यान, एनसीपीसीआर आणि इतर आयोगाचा विचार समितीने केला आहे काय, यासंदर्भात विचारले असता आयोगाच्या एका वरिष्ठ सदस्याने याविषयी नकारार्थी उत्तर दिले. शाळांच्या ऑडिटचा विषय पालकांनी लावून धरला होता. त्यावरही फारसे गांभीर्याने घेण्यात आले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

शुल्क सुधारणा अहवाल आत्तापर्यंत सरकारकडे का सादर करण्यात आला नाही, यावर विधान परिषदेत आम्ही प्रश्न उपस्थित करणार आहोत. मागील वर्षीही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सादर केला नाही. यंदाही बहुतांश प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण होत आली असतानाही अहवाल का दडवला जातोय. शिक्षण विभाग संस्थाचालकांच्या दबावाखाली काम करून कोट्यवधी पालकांना वेठीस धरत आहे.
- नागो गाणार, शिक्षक आमदार.

शाळा शुल्कांचा विषय हा पालकांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे शुल्क सुधारणा समितीकडून अहवाल वेळेत सादर होणे अपेक्षित होते. मात्र तो सादर करण्यासाठी विलंब का होतोय, याची नेमकी माहिती घेतली जाईल. यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना सक्त सूचनाही दिल्या जातील. काही चुकीचे आढळल्यास कारवाईही केली जाईल.
- बच्चू कडू, शालेय शिक्षण राज्यमंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT