मुंबई

म्हणून पालक- विद्यार्थी करणार शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन

संजीव भागवत

मुंबई: राज्यातील खासगी शाळांकडून वसूल करण्यात येत असलेल्या शुल्क विरोधात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या कोणताही ठोस निर्णय घेत नाहीत, त्यामुळे शनिवारी, 13 मार्चला पालक संघटनांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अनेकदा आपण वेळ मागूनही त्या भेटत नसल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याची माहिती इंडियन वाईल्ड पॅरेंटसच्या अड. अनुभा सहाय यांनी दिली.

राज्यातील ज्या श्रीमंत शाळांनी कोरोनाच्या काळात पालकांकडून अधिकचे शुल्क वसूल केल्या अशा शाळांची चौकशी करून त्याचे ऑडिट करण्याचे आदेश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी  दिले होते. मात्र आतापर्यंत शिक्षण विभागाने या शाळांची कोणतीही चौकशी केली नाही. शिवाय ऑडिट सुद्धा केलेले नसल्याने या विषयी पालक संघटनांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पालकांना वाऱ्यावर सोडून शालेय शिक्षण विभागाची कायमच भूमिका हे संस्था चालकांच्या बाजूने असल्याचा आरोपही पालक संघटनांकडून करण्यात आला.

शुल्का संदर्भात शालेय शिक्षण विभागाने नुकतीच एक सुधारणा समिती गठीत केली असून त्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अधिकाऱ्यांच्या विरोधात अनेक तक्रारी असल्याने पालकांनी यावरील जोरदार आक्षेप घेतले आहेत. यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन या समितीतील वादग्रस्त अधिकाऱ्यांना बाजूला केले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यावरही कोणताच निर्णय न झाल्याने आम्हाला शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्यात समोरच ठिय्या आंदोलन देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचेही अड. अनुभा सहाय म्हणाल्या.

गेल्या आठवड्यात राज्यातील पालक संघटनांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. त्याच दरम्यान शिक्षण विभागाकडून शुल्क संदर्भात एक नवीन सुधारणा समिती गठित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यासाठीचा जीआरही काढण्यात आला होता. मात्र त्यात पालकांचा एकही प्रतिनिधी नसल्याने पालकांच्या कोणत्याही प्रश्नांना त्यातून न्याय मिळणार नाही.  पालकांचे सर्व प्रश्न अर्धवट राहिले असल्याने आता आम्ही विद्यार्थ्यांसोबत  शालेय शिक्षण मंत्री यांच्या बंगल्यावर हे आंदोलन करणार आहोत. त्यावरही प्रश्न मार्गी लागला नाही, तर शेवटी आम्हाला नाईलाजाने काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्याकडे जाऊन दाद मागावी लागेल असा इशाराही अड. अनुभा सहाय यांनी दिला आहे.

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Parents students will protest Education Minister Varsha Gaikwad bungalow

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital India Reel Contest: Big News : ...तर ‘Reel’ बनवणाऱ्यांना मिळवता येणार सरकारकडून १५ हजार रुपये!

Love Story : शूटिंगदरम्यान झाली मैत्री, दहा वर्षांचं डेटिंग आणि लग्न; रितेश-जिनिलियाची भन्नाट गोष्ट

Power Supply: कल्याणमध्ये विजेचा खेळखंडोबा, महावितरणावर ठाकरे गट आक्रमक, आंदोलनाचा इशारा

Jalgaon News : जळगावात सरकारी कामात अडथळा; कारवाई टाळण्यासाठी अधिकार्‍यांवर दबाव

Katraj Zoo : राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात १६ हरणांचा मृत्यू; वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण; तपासासाठी नमुने प्रयोगशाळेत

SCROLL FOR NEXT