Building Collapse sakal
मुंबई

Building Collapse : उल्हासनगरमध्ये चार मजली इमारतीचा भाग कोसळला

उल्हासनगर मधील एका इमारतीचा समोरील भाग बाल्कनीसह कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - उल्हासनगर मधील एका इमारतीचा समोरील भाग बाल्कनीसह कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. द्वारकाधाम इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाने तात्काळ धाव घेत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना बाहेर काढत इमारत खाली केली.

उल्हासनगर कॅम्प 3 मधील रामायण नगरच्या बाजूला द्वारका धाम ही चार मजली इमारत आहे. या इमारतीत दोन विंग असून जवळपास 66 सदनिका आणि एक दुकान या इमारतीत होते. इमारत जुनी झालेली असून मोडकळीस आलेली असल्याने त्यात फारसे कुटुंब रहात नव्हते. इमारत जुनी झालेली असून पालिका प्रशासनाने ती धोकादायक घोषित केली आहे. मकातर तरी ही त्यात काही नागरिक वास्तव्यास होते.

गुरुवारी सायंकाळी या इमारतीचा रस्त्याकडील समोरचा भाग कोसळला. यावेळी रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. तसेच ज्या सदनिकांचा बाल्कनीचा भाग कोसळला. त्या सदनिका ही रिकामी असल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित तसेच वित्तहानी झालेली नाही.

सदर घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पालिका प्रशासनाला मिळताच पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंदे, दत्तात्रय जाधव, अग्निशमन अधिकारी बाळू नेटके आदींनी इमारतीत राहणाऱ्या दोन कुटुंबांना इमारती बाहेर सुखरूप काढले. तसेच त्यानंतर इमारतीसमोरील मलबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. दुर्घटना ग्रस्त इमारत ही एका बाजूला झुकल्यासारखी वाटत असल्याने या इमारतीच्या बाजूची अन्य एक इमारत देखील खाली करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: इरफान पठाणने निवडली चेन्नई सुपर किंग्सची Playing XI: MS Dhoni संघाबाहेर, नव्या खेळाडूला दिली संधी

Investment Strategy: FD विसरा! कमी जोखमीमध्ये जास्त रिटर्न देणारे ‘हे 5’ जबरदस्त पर्याय पाहा

Chalisgaon News : गिरणा पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार! तासाभराच्या गारपिटीने शेती पिके जमीनदोस्त; बळीराजा रडकुंडीला

अकोल्यातील वांगरगावात तणाव; शिवरायांचा पुतळा हटविण्याचा वाद; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा खरातचे 100पेक्षा जास्त व्हिडीओ असल्याची धक्कादायक बाब

SCROLL FOR NEXT