Bhayandar News Esakal
मुंबई

Bhayandar Building Collapse: भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मीरा- भाईंदर येथे भाईंदर रेल्वे स्थानक (पुर्व) समोरील बिल्डिंगचा तिकीट खिड़की समोरील इमारतीचा भाग कोसळला आहे. यामध्ये अनेक जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आहे. तर या बिल्डिंगचा भाग कोसळला त्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत सलग दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस सुरु आहे. अशात इमारत खचण्याचा किंवा कोसळण्याचा धोका वाढला आहे.(Latest Marathi News)

या दुर्घटनेत 1 व्यक्ती अडकून पडला होता. सदर व्यक्तीस बाहेर काढण्यात अग्निशमन दलास यश आले असून शोधकार्य अद्याप सुरू आहे.(Latest Marathi News)

भाईंदर रेल्वे स्थानाकाबाहेरील एका जुन्या इमारतीचा भाग कोसळ्याची घटना घडली मात्र यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र तीन जण जखमी झाले आहेत. गेल्या दोन दिवसापासून मीरा भाईंदर शहरात सतत मुसळधार पाऊस सुरु आहे.

आज (गुरुवारी) सकाळी दहाच्या सुमारास भाईंदर पूर्व रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या नवमूर्ती इमारतीचा एका बाजूकडील पहिला माळा कोसळल्याची घटना आहे. सदर इमारत ही ३५ वर्ष जुनी असल्यामुळे तिला मोकळे करून पाडण्याचे काम हाती घेतले असल्याची माहीती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT