Raju Sonawane sakal
मुंबई

उल्हासनगर : आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ पँथर राजू सोनावणे यांचे निधन

उल्हासनगरातील आठवले गटाचे माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

दिनेश गोगी

उल्हासनगर - पँथरच्या काळापासून राजकारण-समाजकारणात सक्रीय असलेले उल्हासनगरातील आठवले गटाचे माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष राजू सोनवणे यांचे निधन झाले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

राजू सोनवणे यांनी 28 एप्रिल रोजी पदाधिकारी-कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोनवणे यांनी जगाचा निरोप घेतल्याने 28 तारखेलाच त्यांच्या जलदानविधी असल्याने स्नेहभोजनाचे रूपांतर जलदानविधीत झाले आहे.

राजू सोनवणे हे 1997 मध्ये कॅम्प नंबर 3 येथील आनंद नगरमधून आठवले गटाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी जिल्हाध्यक्षपदही हाताळले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त बाईक रॅलीचे आयोजन करुन सर्व पक्षीय नेत्याना एकत्र केले होते. 21 तारखेला सायंकाळी त्यांच्या छातीत कळ येत असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची प्राणज्योत मावळली.

राजू सोनवणे यांच्या अंत्ययात्रेत माजी आमदार पप्पू कलानी,आठवले गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत, ज्येष्ठ नेते बी. बी. मोरे, अण्णा रोकडे, ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे, माजी नगरसेवक महादेव सोनवणे, प्रमोद टाले, शांताराम निकम, नाना पवार, गजानन शेळके, दयाल बहादुरे, शिवसेनेचे संघटक नाना बागूल, काँग्रेसचे नेते राधाचरण करोतिया, ज्येष्ठ पत्रकार दिलिप मालवणकर, शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते किरण सोनवणे, पत्रकार राजू गायकवाड, वंचितचे नेते सारंग थोरात, आठवले गटाचे अरुण कांबळे, सुनिल सोनवणे, नाना बिऱ्हाडे, माजी अधिकारी रविंद्र तायडे, दिलीप बागुल, टीम ओमी कलानीचे शिवाजी रगडे यांच्या सह हजारो महिला पुरुष सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

Latest Marathi News Live Update: भारत हा एक महान देश आहे, सोशल मीडियावरील वादग्रस्त 'रीपोस्ट'नंतर ट्रम्प यांचे विधान

Indurikar Maharaj: नाद करता काय? इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; ट्रोलर्सना दिलेलं चॅलेंज पूर्णच करणार?

IPL 2026 सुरू असताना अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, हे नव्या संघात दाखल; फ्रँचायझींचा डाव

SCROLL FOR NEXT