प्रवाशांची बाकडी पावसाच्या पाण्यात गंजली 
मुंबई

प्रवाशांची बाकडी पावसाच्या पाण्यात गंजली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेच्या अनेक प्रमुख स्थानकांतील फलाट ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांनी ओसंडून वाहत असतात. अनेक स्थानकांत प्रवाशांना बसण्यासाठी आसने नसल्याने त्यांना उभ्यानेच लोकलची प्रतीक्षा करावी लागते. असे असताना घाटकोपर स्थानकाच्या पूर्वेला रेल्वेरुळांना लागून ५० च्या आसपास बाकडी पडून आहेत. पावसामुळे ती गंजली आहेत. पावसाळ्यानंतर ती वर्कशॉपमध्ये दुरुस्तीला पाठवली जातील, असे रेल्वे प्रवक्‍त्यांनी सांगितले.
 
जुनी बाकडी बदलून त्या जागी नवी बसवण्यात आली आहेत. जुनी बाकडी तातडीने दुरुस्त करून ती गरज असलेल्या ठिकाणी लावण्याचे रेल्वेला सुचले नाही. त्यामुळे सहा महिने ऊन-पाऊस खात रेल्वेच्या आवारात ती पडली आहेत. ती आधीच दुरुस्तीला पाठवून वापरली का नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

प्रवाशांना रेल्वेस्थानकात विश्रांतीसाठी आसने बसविण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले. मात्र, त्याची अंमलबजावणी रखडल्याने अनेक प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. स्थानकात आसने नसल्यामुळे महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. आसने मंजूर होऊनही त्यांची अंमलबजावणी झालेली आहे. प्रवाशांना उभे राहून लोकल प्रतीक्षा करावी लागत आहे.

दहाच आसने लागली
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांसाठी ७३ रेल्वे स्थानकांमध्ये एकूण १५०० स्टीलची आसने बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये जुलै महिन्यात विविध प्रकारची ८० आसने मंजूर केली. मात्र महिन्यानंतरही केवळ १० आसने लावण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

SCROLL FOR NEXT