Mega Block sakal
मुंबई

Mega Block : प्रवाशांचे होणार हाल! रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १९ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप- डाऊन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप- डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे -

कुठे- सीएसएमटी-विद्याविहार अप- डाऊन धीम्या मार्गावर

कधी- सकाळी १०. ५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान थांबून विद्याविहार स्टेशनवर योग्य डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर

कुठे- सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे अप- डाऊन हार्बर मार्गावर

कधी- सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी /वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि सीएसएमटी येथून वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे. तर पनवेल/बेलापूर/वाशी आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

परेचा आज रात्री ब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानका दरम्यानचा आज,शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या मार्गावर रात्री साडे अकरा ते मध्यरात्री साडे तीन वाजेपर्यत दुरुस्ती करणयात येणार आहे. दरम्यान रविवारी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT